
हिमायतनगर ( प्रतिनिधी ) अत्यंत स्पर्धात्मक समजल्या जाणाऱ्या देशपातळीवरील सैनिकी स्कूल प्रवेश प्रक्रियेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायवाडी शाळेच्या स्वयंदीप शंकर गच्चे या विद्यार्थ्याने उल्लेखनीय कामगिरी करत ३०० पैकी २६० गुणासह त्याची पहिल्याच फेरीमध्ये महाराष्ट्रातील अव्वल समजल्या जाणाऱ्या सैनिकी स्कूल चंद्रपूर साठी निवड झाली आहे. सैनिकी स्कूल प्रवेश प्रक्रियेच्या एकूण सहा फेऱ्या होतात. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तसेच त्याने नवोदय प्रवेश परीक्षेत देखील उल्लेखनीय कामगिरी करत ९०% गुण प्राप्त केले आहेत. तसेच राज्य पातळीवर होणाऱ्या मंथन परीक्षेत देखील गेल्या वर्षी त्याने सुवर्णपदक पटकावले आहे. त्याचबरोबर भारत टॅलेंट सर्च परीक्षेत देखील त्याला गेल्या वर्षी सुवर्णपदक मिळाले आहे. स्पर्धात्मक परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी बालवयापासून तयारी करणे आवश्यक असल्याचे मत स्वयंदीपने व्यक्त केले आहे. स्वयंदीपच्या यशात हिमायतनगर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी केशव मेकाले साहेब. सरसम बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी पंडितराव तळेगावकर , कन्या बीट हिमायतनगरचे शिक्षण विस्तार अधिकारी अरुण पाटील, पोटा केंद्राचे केंद्रप्रमुख पद्माकर कुलकर्णी, सरसम केंद्राचे केंद्रप्रमुख गणेश कोकुलवार केंद्रीय मुख्याध्यापक पट्टेवाड, योजना प्रमुख संजय जाणते,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शामराव हरी आडे, ग्रामविकास अधिकारी आनंद कदम, सरपंच कांताबाई बरडे, उपसरपंच मधूकरराव राठोड, तसेच गावचे कारभारी, नायक, पोलीस पाटील, त्याच्या आयुष्यात आई-वडिलांचे मोलाचे योगदान आहे.

स्वयंदीपला मार्गदर्शन करणारे सहशिक्षक दत्ता मुसांडे, चंद्रकांत जाणते, प्रियंका आंबुरे तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक, गावकरी यांच्यावतीने अभिनंदन केले जात आहे.
