
नांदगाव (प्रतिनिधी) मराठा विद्या प्रसारक समाजाचे होरायझन अकॅडमी नांदगाव शाळेत “महाराष्ट्र दिन” व “कामगार दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम ध्वजपूजन करून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभासद रविकांत रामचंद पाटील यांच्या हस्ते भारतीय राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय समितीचे सदस्य डॉ.गणेश चव्हाण शालेय प्राचार्या श्रीमती. पुनम डी.मढे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शालेय प्राचार्या श्रीमती पुनम डी. मढे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. शालेय शिक्षक सिताराम पिंगळे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त माहिती सांगितली.तसेच महाराष्ट्राचे ऐतिहासिक महत्त्व समजावून सांगितले. व कामगारांच्या कष्टांचे समाजातील योगदान अधोरेखित केले.राष्ट्रगीत व राज्यगीताने शालेय परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षक सिताराम पिंगळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
