
सिन्नर ( प्रतिनिधी )१ मे २०२६ भगवान गौतम बुद्ध यांची जयंती व महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन सिन्नर संविधान प्रेमींच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला*या कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सौ.शोभा राजेंद्र जाधव नगरसेविका तथा गटनेत्या यांचे हस्ते पुष्प अर्पण करण्यात आला.*या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की* *तथागत गौतम बुद्ध** जगातील सर्वात श्रेष्ठ संतगौतम बुद्ध हे जगातील सर्वात महान धर्मगुरूंपैकी एक मानले जातात. बौद्ध धर्माचे प्रवर्तक म्हणून ते जगभर ओळखले जातात.गौतम बुद्धांच्या शिकवणींमुळे आध्यात्मिक विकास, नैतिक मूल्ये, सामाजिक सुधारणा आणि जागतिक शांतता या क्षेत्रात मोलाचे योगदान झाले आहे. त्यांचे तत्वज्ञान आजही जगभरातील लोकांना मार्गदर्शन करत आहे. अशा महान संत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व *महाराष्ट्र राज्याची स्थापना* १ मे १९६० रोजी झाली. तेव्हापासून राज्यभरात प्रत्येक वर्षी एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच दिवशी भारतीय तिरंगी ध्वज सन्मानाने फडकवल्या जातो तर *१ मे रोजी जगभरात कामगारांच्या* हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. ८ तासांच्या कामाच्या वेळेसाठी १८८६ मध्ये अमेरिकेत झालेल्या आंदोलनानंतर या दिवसाची सुरुवात झाली. कामगारांच्या हक्कांचे रक्षण, त्यांना सन्मान देणे आणि कामाचे तास (८ तास) निश्चित करण्यासाठी. १ मे १८८६ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरात कामगारांनी कामाचे तास ८ करावेत, यासाठी मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनात कामगारांना मोठा संघर्ष करावा लागला कामगार दिन भारतात पहिला कामगार दिन १ मे १९२३ रोजी चेन्नई (मद्रास) येथे तर दुसरा कामगार दिन महाराष्ट्रात झाला सर्वांना कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा*यावेळी महामित्र दत्ता वायचळे यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे लिखित पुस्तकाचे वाचन खरा शिवाजी कोण होता सामूहिक रित्या वाचन करण्यात आली**याप्रसंगी जगन्नाथ कटरनवरे व धम्मपाल शिरसाठ यांनी बुद्ध वंदना घेतली**या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मुठे यांनी केले तर प्रास्ताविक राजेंद्र जाधव यांनी केले तर आभार प्रभाकर जाधव यांनी मानले* यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित महामित्र दत्ता वायचळे नगरसेविका शोभाताई जाधव मा.नगरसेवक प्रभाकर जाधव आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे सह संस्थापक विजय मुठे राजेद्र जाधव हर्ष जाधव अशोक भालेराव अशोक घेगडमल शशिकांत दिवे धम्मपाल शिरसाट जगन्नाथ कटारनवरे माणिक जाधव धोंडीराम जगताप संतोष वाघ राजेंद्र दिवे भागवत जाधव अनिल जाधव रमाताई जाधव आदि उपस्थित होते
