
नाशिक जिल्हा प्रतिनिधी -( नवनाथ गायकर यांजकडुन )-
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे ३२ वे मराठी साहित्य संमेलन धाराशिव येथे दि.२९,३० मे रोजी
लोकनेते अजितदादा पवार साहित्य नगरीमध्ये संपन्न होणार आहे.
साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांनी ही माहिती दिली आहे.
धाराशिव अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद या साहित्यातल्या आग्रणी असलेल्या संस्थेच्या वतीने 32 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन दिनांक 29 व 30 मे 2026 रोजी धाराशिव येथे संपन्न होणार आहे
दिवंगत लोकनेते अजितदादा पवार साहित्य नगरीस यांचे नाव देण्यात आले आहे अशी माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे
यावेळी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे उपस्थित होते
ग्रंथदिंडी उद्घाटन समारंभ परिसंवाद चर्चासत्र कथाकथन कवी संमेलन असे संमेलनाचे स्वरूप असून या साहित्य संमेलनास देशभरातून नऊशे साहित्यिक उपस्थित राहणार आहेत या अगोदर पुणे मुंबई संगमनेर छत्रपती संभाजी नगर लातूर उदगीर जव्हार सांगली कराड गोंदिया तुळजापूर आदी ठिकाणी हे साहित्य संमेलन संपन्न झाले असून या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद दमा मिराजदार नारायण सुर्वे सुरेश भट केशव मेश्राम रा र बोराडे नरेंद्र जाधव लक्ष्मण माने शिवाजी सावंत आधी जणांनी भूषवले असून जावेद अख्तर पु ल देशपांडे शरद पवार ना.धो महानोर आधी जणांनी संमेलनाचे उद्घाटन केले आहे
