
चिखली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र दिनानिमित्त नगरपरिषद उर्दू शाळा क्रमांक ३ येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. माननीय आरोग्य सभापती विष्णू जोगदंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी शाळेच्या परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले.

कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.या प्रसंगी मान्यवरांनी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे क्षणचित्रे सर्वांच्या आठवणीत राहतील असे ठरले.
