
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८३४ वा दिवस
एखाद्या मुद्द्यावर कोणी विरोध करत असेल तर ती व्यक्ती तुमच्या विरोधात आहे असा निष्कर्ष काढण्याची घाई करू नका. येथे ध्यानात असू द्या की शुचिता, धैर्य, आणि दृढतेने तेच यश शक्य आहे. आपल्याला लोकांना संघटित करण्याच्या कामात स्वतःला गुंतवून घ्यायचे आहे. आपल्याला माहीत आहे की संपूर्ण सृष्टी ही आपापसात जोडलेली आहे. एखादी व्यक्ती उच्च ध्येयाचा स्पष्ट दृष्टिकोन ठेवून काम करत असेल तर हळूहळू परिस्थिती आणि आजूबाजूचे लोकही उच्च विचार व उच्च मिशनचा भाग बनण्यासाठी परावर्तित होतात.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १२ फाल्गुन शके १९४६
★ फाल्गुन शुध्द /शुक्ल ४
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ सोमवार दि. ३ मार्च २०२५
★ १७०७ तब्बल २७ वर्षे मराठ्यांशी कडवी झुंज दिल्यानंतर मुघल बादशहा क्रुरकर्मा औरंगजेब याचा महाराष्ट्रात मृत्यू
★ १८३९ आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्मदिन
★ १९३० नाशिक येथील काळा राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.
★ १९४८ हिंदू महासभेचे व नाशिक येथील भोसला सैनिकी शाळेचे संस्थापक बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचा स्मृतीदिन.
★ जागतिक वन्यजीव दिन
★ जागतिक श्रवणशक्ती दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
