
सिन्नर(प्रतिनिधी) आज जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा स्मारक सिन्नर येथे सिटूच्या वतीने, कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित, शिवाजी कोण होता? या ग्रंथाचे सामुदाईक वाचेन करण्यात आले,
तसेच कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे महत्व तसेच चालू परिस्थितीत कामगारांचे प्रश्न यावर मार्गदर्शन करण्यात आले,
महामित्र दत्ता वायचळे यांनी कामगार कायदे बदलल्या नंतर कामगारांचे हाल होऊ नये यासाठी संघटित रहाण्याचे आवाहन केले,

प्रा, राजाराम मुंगसे यांनी कामगार दिनाचा व महाराष्ट्र दिनाचा इतिहास समजावून सांगितला, तसेच महाराष्ट्र दिनाचे गीत गायले,
प्रा, जावेद शेख सर यांनी छत्रपती शिवाजी यांच्या जीवनावर प्रकाश टाकत, समतेचा विचार उपस्थितनसमोर मांडला,
विध्यार्थी चळवळीतील कुणाल माळी यांनी तरुणांना संघटित होण्याचे आव्हान केले,
कॉ, हरिभाऊ तांबे यांनी प्रास्ताविक केले,
कॉ, संतोष कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले,
यावेळी माळेगाव व मुसळगाव एम आय डी सी मधिल कामगार मोठयासंख्येने उपस्थित होते.
