
नांदगाव ( प्रतिनिधी )-कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथे ‘महाराष्ट्र दिन’ व ‘कामगार दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील भारतीय राष्ट्रध्वजाचे पूजन व आरोहण मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आजीव सभासद श्री. जगन्नाथराव चोळके यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. यु.पाटील यांनी सर्व उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. इ.11वीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे नांदगाव तालुका संचालक इंजि. मा.अमितभाऊ बोरसे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी संचालक मा.इंजि.अमित बोरसे पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना ‘महाराष्ट्र दिन’, ‘कामगार दिन’तसेच इ.11वीच्या परीक्षेत प्राविण्य मिळविल्याबद्दल शुभेच्छा दिल्या व भावी शैक्षणिक वाटचालीत यश संपादन करण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याचे आवाहन केले.

कनिष्ठ महाविद्यालयातील इ.11वी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थी
*विज्ञान शाखा-*
प्रथम– कु.पाटील श्रेया योगेश,
द्वितीय– माजगीर आकांक्षा दिलीप
,तृतीय– नेरकर अनुष्का भाऊसाहेब
चतुर्थ– कुलथे नयन विकास
पाचवा– बनबेरु नयन निलेश
*वाणिज्य शाखा-*
प्रथम– घाडगे अनुजा रवींद्र
द्वितीय– टिळेकर अश्विनी रंगनाथ
तृतीय– गांगुर्डे वैष्णवी सोमनाथ
चतुर्थ– गुळेचा रितेश महावीर
पाचवा– देवकर कीर्ती गजानन
*कला शाखा-*
प्रथम -बोराडे गीतांजली एकनाथ
द्वितीय– सरोदे साक्षी बाळासाहेब
तृतीय-शिंदे योगिता संजय
चतुर्थ -शिंदे स्वाती सुरेश
पाचवा-मगर वैष्णवी सुनील
ह्या यश संपादित करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तालुका संचालक इंजि.मा. अमित बोरसे पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.यु.पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार संपन्न झाला. याप्रसंगी श्रेया पाटील व गीतांजली बोराडे या विद्यार्थिनींनी महाविद्यालयाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.

कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील प्राध्यापक बी.वाय.आहेर हे 31मे 2026 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने ‘महाराष्ट्र दिन’ व ‘कामगार दिनाचे’ औचित्य साधून सेवापुर्ती निमित्त त्यांचाही सपत्नीक सत्कार सोहळा म.वि.प्र.तालुका संचालक इंजि.मा.अमितभाऊ बोरसे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी अनुक्रमे मा.बाळासाहेब कवडे, मा.योगेश बोरसे,मा. अरविंद पाटील,मा.जनार्दन पवार, डॉ.एस.ए.मराठे, विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ‘महाराष्ट्र दिन’ कार्यक्रम सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनुक्रमे वरिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.लोकेश गळदगे व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डी.एम.राठोड यांनी केले तर ‘विद्यार्थी गुणगौरव’ व ‘सेवापूर्ती सोहळ्याचे’ सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनुक्रमे प्रा.बी.के.पवार व प्रा.पी.एन.जपे यांनी केले.
