
लोहोणेर येथील जनता विद्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करताना शालेय समिती अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख यांच्यासमवेत मुख्याध्यापिका कल्पना शिंदे, उपमुख्याध्यापक निंबा ठाकरे, पर्यवेक्षक विलास निकम व उपस्थित मान्यवर.(छाया-:सुनिल एखंडे)
लोहोणेर-: येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी शालेय समिती अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश आहिरे, प्रभाकर झाल्टे, पंडित निकम,रामदास बागुल, रतीलाल परदेशी,युवराज बागुल, दिपक देशमुख,डॉ.सुभाष आहेर,अविनाश महाजन,रमेश देसले, जितू पाटील, दादाजी शेवाळे,यशवंत शेवाळे,राकेश जाधव,सविता देशमुख,रूपाली धामणे, जयश्री बच्छाव आदींसह मुख्याध्यापिका कल्पना शिंदे,उपमुख्याध्यापक निंबा ठाकरे व पर्यवेक्षक विलास निकम व्यासपीठावर उपस्थित होते.प्रास्ताविकात मुख्याध्यापिका कल्पना शिंदे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.यानंतर माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. गीतमंचाने वंदे मातरम्, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करून वातावरण देशभक्तीमय केले.यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी ज्योत्स्ना परदेशी, लखन परदेशी, राकेश शेवाळे, मयुरी आहिरे व प्रसाद बागुल यांची पोलीस दलात निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच क्रीडा शिक्षक शशिकांत आहेर व वरिष्ठ लिपिक ज्ञानदेव केदार यांचा सेवापूर्ती निमित्त गौरव करण्यात आला.इयत्ता चौथी व नववीतील प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी राजेंद्र अमृतकर व सेवानिवृत्त मुख्याध्यापिका संगीता सागर यांनी दिलेल्या देणगीतून उभारण्यात आलेल्या सायकल स्टँड व प्रवेशद्वाराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.यावेळी अभिनव बालविकास मंदिर, जनता विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे यांनी केले.
