
मुळडोंगरी (प्रतिनिधी )श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय मूळडोंगरी* येथे विद्यालयात *1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन* मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय .एस.जी.राठोड साहेब तसेच सचिव सिद्धांत दादा राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली.कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. बोरसे. मॅडम यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच ध्वजारोहण करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या शिक्षिका सौ.सोनवणे मॅडम यांनी केले त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर महाराष्ट्र दिन व कामगार दिन याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच आभार प्रदर्शन श्री.जाधव सर यांनी केले. त्याचबरोबर मुख्याध्यापिका सर्व शिक्षक,शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना निकाल पत्रक व खाऊचे वाटप करण्यात आले.
