
सिन्नर ( प्रतिनिधी )१४ जानेवारी २०२६ जिवाजी महाले यांच्या स्मृतिदिनानिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन करण्यात आली

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्यास व जिवाजी महाले प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की
शिवरायांनी आठरापगड जातींतील मावळ्यांच्या मदतीने स्वराज्य निर्माण केले परतु स्वराज्य निर्माण करताना अनेक मौल्यवान हिरे लयाला गेले त्यांच्या या कार्यात तन मन धनाने या सर्वानी सहकार्य केले यात सर्वात महत्वाची भुमिका शिवरायांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांची होती होते जिवाजी म्हणुन वाचले शिवाजी स्वराज्याची धुरा ज्यांनी तळहातावरील फोडाप्रमाणे जपल स्वत:च्या खंद्यावर घेतली व वेळप्रसंगी मृत्यूलाही सामोरे गेले जिवाजी महाले यांच्या निप्ठेमुळेच शिवरायांनी अफजल खानासारया गिधाड व कृण्णाजी भास्कर सारखा देशद्रोह सहज संपवले तसेच जिवाजीनी अफजल खानाचा अत्यंत चपळ अंगरक्षक संपवून शिवरायांचे प्राणा वाचवले व शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य निर्माण करण्यासाठी मोठे योगदान होते अशा महान जिवाजी महाले यांना विनम्र अभिवादन
या कार्यक्रमाचे सुञसंचलन आर टी जाधव यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले तर आभार शरद शिंदे यांनी मानले
याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे,शरद शिंदे आर टी जाधव, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे,सोमनाथ लोहारकर गणपत काळे सुभाष परदेशी मनोज माळी प्रकाश माळी गोपीनाथ वाजे,शिवाजी सातपुते सुनिल उगले जितेंद्र सरले आदि उपस्थित होते
