
नांदगाव ( प्रतिनिधी) नांदगाव येथील प्रसिद्ध विधीज्ञ ॳॅड. अर्चना धवलचंद्र आढाव यांना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संस्कृती मंत्रालय, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या वार्षिक शिक्षण समिट २०२५ मध्ये मुंबईत नॅशनल आर्ट गॅलरीत उद्योग मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार ॳॅड.आशिष शेलार,प्रेम शुक्ला भारतीय संस्कृती मंत्रालयाच्या निधी चौधरी यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण झाले.डाॅ. रचना भिमराज, बिपिन गुप्ता, प्राचार्य डॉ. सरिता गोम्स याही उपस्थित होत्या.
