
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१५२ वा दिवस
संपूर्ण तादात्म्यतेची भावना ही पहिली पायरी झाली. तद्नंतर परिस्थितीवर योग्य तोडगा शोधून काढला पाहिजे. आपल्या परंपरेतील जुन्या कल्पना म्हणजे तुम्हाला निव्वळ अंधश्रद्धा वाटत असणे शक्य आहे. पण त्यात सत्याचे सुवर्णकण लपलेले आहेत. ज्या योगाने हीण जळून जाईल आणि शुद्ध सोने तेवढे उरेल असा काही उपाय तुम्हाला गवसला आहे काय? केवळ पोकळ गप्पांमध्ये शक्तीचा अपव्यय करण्याऐवजी तुम्ही एखादा प्रत्यक्ष उपाय शोधून काढला आहे काय? हे लोक जिवंतपणे ज्या यमयातना भोगीत आहेत, त्या हलक्या करण्यासाठी सांत्वनाचे चार गोड शब्द तुम्ही त्यांच्याशी बोलता काय? की केवळ टीकाच करता? जर तुम्ही मधुर शब्द बोलत असाल तर ती दुसरी पायरी झाली.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर पौष २६ शके १९४७
★ पौष वद्य /कृष्ण १३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. १६ जानेवारी २०२६
★ १६८१ छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक.
★ १९०९ धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा स्मृतीदिन
★ १९५४ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार, कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचा स्मृतीदिन
★ १९९७ मुंबईतील गिरणी कामगारांचे नेते डॉ. दत्ता सामंत यांची गोळ्या झाडून हत्या झाली.
