
नांदगाव ( प्रतिनिधी ) येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे राजेश शिंदे यांची तर स्वीकृत नगरसेवक पदी भाजपचे व्यापारी आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्तराज छाजेड यांची निवड करण्यात आली नगराध्यक्ष सागर हिरे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पहिल्याच विशेष सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य निवडीसाठी प्रक्रिया पार पडली या सभेला वीस पैकी 19 सदस्य उपस्थित होते. पहिल्या सत्रात उपनगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया पिठासनाधिकारी असलेल्या नगराध्यक्षांनी सुरू केली शिवसेनेचे प्रभाग तिनचे नगरसेवक राजेश शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला

स्वीकृत सदस्य पदासाठी भाजपचे दत्तराज छाजेड यांचा एकमेव अर्ज दाखल झाला स्वीकृत सदस्यांची संख्या दोन असली तरी आज तांत्रिक पुर्तते अभावी अन्य इच्छुकांना नामांकन दाखवील करता आले नाही सभेला शिवसेनेच्या गटनेत्या स्वाती नावंदर, कल्पना जगताप, ॲड. विद्या कसबे, शोभाताई कासलीवाल, योगिता खरोटे, स्नेहल पाटील, राखी जाधव, रुपाली पाटील, जुबेदा बी गफ्फार खान, गायत्री शिंदे, किरण देवरे, काका सोळसे, वाल्मिक टिळेकर, दिपक पांडव, पृथ्वीराज पाटील, काशिनाथ देशमुख, मुख्याधिकारी शामकांत जाधव, प्रशासन अधिकारी हर्षदा राजपूत, वरिष्ठ लिपीक विजय कायस्थ, अंबादास सानप, बाबासाहेब शिंदे, अरुण निकम, उपस्थित होते. सहाय्यक प्रकल्प अधिकारी आनंद महिरे यांनी प्रास्ताविक केले.

