
नाशिक ( प्रतिनिधी) चला चला 🔥🔥🔥शेकोटी लोककला साहित्य संमेलनाला |भावबंधन मंगल कार्यालयाच्या दरबारी लुटू या लोककलांसह साहित्याची शिदोरी ॥🔥📚🦚✍️🔥📕✒️📘✍️पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पवित्र गिरणामाईच्या तिरी सप्तशृंगी मातेच्या दरबारी गिरणा गौरव प्रतिष्ठानने घुमविली तुतारी सुरेशजी पवारांची उत्तुंग भरारी उदात्ततेचा ध्यास अंतरी व्यक्ति , कुटुंब व समाजहितैषी सत्कार्याची गंगा बहरली गिरणामाईच्या जलतीर्थाची किमया न्यारी संस्कृती संवर्धनाला गती मिळाली .सन १९९९ च्या नोव्हेंबर महिन्यात सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी निसर्ग देवतेचा वरदहस्त लाभलेल्या समृध्द व संपन्न परिसरात गिरणादूत श्रीमान सुरेशजी पवार यांच्या हृदयस्थ संकल्पनेतून गिरणा गौरव प्रतिष्ठान या आगळ्या वेगळ्या संस्थेची पायाभरणी झाली . ज्येष्ठ लोकसेवक , कर्मयोगी श्रध्देय दादासाहेब बिडकर यांच्या पावन उपस्थितीत हा आविष्कार घडला . आपल्या मातृभूमीसाठी , मातृभाषेसाठी , साहित्य , लोककला , संस्कृतिसंवर्धनासाठी , देशबांधवांच्या सर्वांगीण उन्नयनासाठी कृतज्ञतायुक्त अंतःकरणाने झिजावं , समर्पित व्हावं हा ध्यास घेऊन कृतिशील झालेल्या, झपाटलेल्या गिरणादूताने हळू हळू आपल्या जनहितैषी उपक्रमांची व्याप्ती , खोली , उंची व गुणवत्ता चौफेर वृद्धिंगत केली . माणसं जोडली, कुटुंबे जोडली , संस्था संघटना जोडल्या . या सगळयांना जोडायचं , संघटीत करायचं , त्यांचं कौशल्य , क्षमता , गुणवत्ता सत्कार्यात गुंफायची अन् लोकयज्ञ सुनियंत्रित ठेऊन उत्तम कार्य करायचं हे दुर्मिळ कसब सुरेशजींजवळ असल्यामुळे गिरणा गौरव प्रतिष्ठानने भरभक्कमपणे रौप्यमहोत्सवापर्यंत देदिप्यमान , लक्ष्यवेधी व अविस्मरणीय कामगिरी केली आहे . माणसातलं तत्त्व , सत्व , गुरुत्व , गुणत्व , ध्यानत्व, आत्मत्व , विशेषत्व , कलाकौशल्य या अंगाने शोध घेऊन त्यांना प्रेरणा , प्रोत्साहन , बळ देऊन प्रकाशमान करणारी कार्यशैली अंगिकारल्यामुळे गिरणागौरव प्रतिष्ठानला अर्थात गिरणादूत सुरेशजी व त्यांच्या सहयोगी समुहाला जनताजनार्दनाच्या अंतःकरणात आदराचं स्थान मिळालं . संस्थात्मक लोकहितैषी कार्याचा दीपस्तंभ म्हणजे गिरणागौरव प्रतिष्ठान असं समीकरण बनलं .🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥📚📕📗✒️🦚🦚🦚१७ व १८ जानेवारी २०२६ ला मकर संक्रमणाच्या मंगल पर्वकाळात श्रीक्षेत्र नाशिकच्या मखमलाबादरोडवरील भावबंधन मंगल कार्यालयात साहित्य व लोककला पंढरीच्या वारकऱ्यांचा अफलातून महाकुंभमेळा सुरेशजींनी आयोजित केला आहे . गिरणामाईचे जलतीर्थ व गोदामाईच्या रामतीर्थाचा संगम म्हणजे शेकोटी साहित्य व लोककला संमेलन . गेला महिनाभर महाराष्ट्र , महाराष्ट्राच्या बाहेरुन साहित्यिक , कलावंत , रसिक , कलाप्रेमी जनगण या संमेलनाच्या तयारीसाठी कार्यमग्न व समर्पित झाले आहेत . शेकोटी साहित्य व लोककला संमेलन ही संपकल्पनाच जिज्ञासा जागृत करणारी , मन बुध्दीला आकर्षित करणारी आहे . साहित्याचे विविधरंग , विविधगंध लोककलांच्या विविध छटा , विविधभाव हे सगळं थंडीत अन् शेकोटीच्या सहवासात . साहित्यिकांना , कलावंतांना व रसिकांना व्यक्त होण्याची , आस्वाद घेण्याची , स्वात्मानंद लुटण्याची अनमोल संधी . वर्तमानात साहित्यिक , सांस्कृतिक , कलात्मक , आध्यात्मिक , वैचारिक ,सार्वजनिक उपक्रम , कार्यक्रम , संमेलने आयोजित करणे हेच खूप अवघड व धाडसाचं बनत चाललं आहे .टी .व्ही ., भ्रमणध्वनी , नव्या नव्या वैज्ञानिक सेवा , सुविधा व साधनांनी माणूस जीवन सकस , समृध्द व संपन्न करणाऱ्या मुलभूत घटकांना विसरत चालला , त्यापासून दूर दूर चालला . अशा पार्श्वभुमीवर गिरणा गौरव प्रतिष्ठानचा हा अक्षरोत्सव , लोकोत्सव नवी आशा व दिशा निर्माण करणारा ठरेल . काल प्रवाहात नव्याच्या मोहात आणि प्रेमात जुन्यातलं सोनंही आपण दूर ढकललं . देह मंदिर आणि विश्वमंदिराला सर्वांगसुंदर , प्रसन्न , उत्साही , आनंदी , प्रदूषणमुक्त, पर्यावरणसंपन्न ,सुसंवादी व स्वात्मानंदी बनविण्याचा ध्यास घेतलेल्या व्यक्ति , संस्था , संघटना , समुह कार्यरत आहेत . त्यापैकी गिरणादूत आत्मिय श्रीमान सुरेशजी पवारांचे गिरणागौरव प्रतिष्ठान हा एक प्रेरणापुंज . श्रीक्षेत्र नाशिकच्या हुतात्मा स्मारकात २२० हून अधिक जुन्या नव्या साहित्यिकांनी आपल्या मनोगताद्वारे साहित्यकृतींना उजाळा दिला .आठवडयातून दोन दिवस मंगळवार आणि शुक्रवार साहित्यिकासह साहित्य उर्जेचा गजर आणि जागर हा खरोखर पराक्रम आहे . दरवर्षी श्रीक्षेत्र नाशिकमध्ये रंगणारे शेकोटी लोककला साहित्य संमेलन म्हणजे एक अफलातून आणि हृदयस्पर्शी अनुभव .मी या संमेलनाचा आवर्जुन आस्वाद आणि आनंद घेतो .या संमेलनात येणारे कलावंत , साहित्यिक यांना पारंपारिक वेशभूषेत , विविध कलाकौशल्यासह बघणे , त्यांची देहबोली , अभिनय , सादरीकरणातलं कौशल्य , रंग , ढंग वाद्ये हत्यारे , उपकरणे , त्यांच्यातून स्त्रवणारे अलग अलग प्रकारचे ध्वनि , शेकोटीच्या सहवासातील कवी संमेलन , रांगोळ्या , पुस्तक प्रदर्शन , कलाकार व साहित्यिकांची वेगवेगळ्या बाजांची भाषणे जुन्या काळातील कलेचं आत्मानंदी वैभव या संमेलनाचं शक्तिस्थळ असतं . तसं हे सर्व संघटन , आयोजन , अंमलबजावणी त्यासाठी आवश्यक धन , मनुष्यबळ , त्यांची विभागणी , जबाबदाऱ्यांचे वाटप , सुसंवाद , ऐक्य हा विचार केला तर शेकोटी लोककला साहित्य संमेलन म्हणजे एक सांस्कृतिक अग्निदिव्य सगुण साकार करणे . पण गिरणा गौरवच्या समुहाने गिरणादूत सुरेश पवारांच्या सर्वस्पर्शी , बहुगुणी व अजातशत्रू नेतृत्वाखाली हे शिवधनुष्य पेललं . खरं तर गिरणामाईने गोदामाईला पाठवलेला अनमोल सांस्कृतिक अन् साहित्यिक उपहार म्हणावा लागेल. 🔥📚✍️१७ आणि १८ जानेवारी २०२६ ला श्रीक्षेत्र नाशिक शेकोटी , लोककला व साहित्याच्या त्रिवेणी संगमात चिंब भिजणार . साहित्य तपस्वी अलकाताई दराडे संमेलनाचं अध्यक्षपद भुषवित आहेत . साहित्य जगणाऱ्या सुनंदाताई पाटील या स्वागताध्यक्ष आहेत . सुप्रसिद्ध संवेदनशील कवी , समीक्षक श्रीमान विवेकजी उगलमुगले कवी संमेलनाची धुरा सांभाळणार आहेत . आज आणि उद्या दोन दिवस श्रीक्षेत्र नाशिक शेकोटीसह १४ विद्या , ६४ कलांच्या उर्जेत , प्रकाशात , प्रवाहांमध्ये चिंब चिंब होणार आहे . भावबंधन मंगलकार्यालयातून या बहुरंगी , बहुढंगी , अफलातून संमेलनाद्वारे लोककलांचा जागर , लोक साहित्याचा गजर होणार आहे . लोककलांचे उपासक , साहित्याचे आस्वादक , रसिकजन , जिज्ञासू यांच्यासाठी हे हृदयंगम संमेलन म्हणजे मंगलपर्वणी आहे . गेल्या तीन संमेलनांनी जे चैतन्य निर्माण केलं , उर्जा प्रक्षेपित केली , आत्मानंद दिला त्याला तोड नाही . आजपासून रंगणारं शेकोटी लोककला साहित्य संमेलन हा रसिक जनांसाठी हृदयस्पर्शी उपहार आहे . या संमेलनात वैविध्य आहे ,नाविन्य आहे , जिज्ञासा जागृत करणारे संकल्प अन् त्यांचे सुरंगी सादरीकरण आहे .💐आज ११ वाजता उद्घाटन , दुपारी ३ वाजता लावणी स्पर्धा , ५ वाजता गझल संमेलनासह सांस्कृतिक कार्यक्रम . रात्री ८ वाजता शेकोटी कविसंमेलन सुरू होऊन रात्रभर रंगणार , कवितांचा पाऊस व शेकोटीचा उर्जा आणि प्रकाश असा हटके अनुभव इथं आहे .परिसंवादही आहे . रविवारी सकाळी ९ वाजता बालकविसंमेलन , अहिराणी कविसंमेलन , महिला परिसंवाद , निमंत्रितांचे कविसंमेलन , दुपारी ३ वाजता पुरस्कार वितरण , निळुभाऊफुले वाङ्मय पुरस्कार , पद्मश्री स्मिता पाटील शब्दपेरा पुरस्कार , डॉ .म . सु . पाटील पुरस्कार , शिक्षणमहर्षी संभाजीबापू पगारे लोकसेवा पुरस्कार , सामुहिक लोकनृत्य , तिळगूळ वाटप व नवनिर्वाचित नगरसेवकांचा हृद्य सत्कार सोहळा रंगणार आहे .श्रीक्षेत्र नाशिकमध्ये रंगणारं असं संमेलन म्हणजे स्वतःला आतुन श्रीमंत आणि स्वात्मानंदी करणारा भावानंदी उपहार आहे . सहपरिवार आज आणि उद्या दोन दिवस मनमुराद आनंद लुटण्यासाठी भावबंधन मंगल कार्यालयात शेकोटी लोककला साहित्य संमेलनात जायलाच हवं . तहानलाडू , भूकलाडूची सुविधा आहेच . चिंता करू नका . तुम्ही फक्त जिज्ञासू आस्वादक बनून या .निमंत्रक _ गिरणा गौरव प्रतिष्ठान .श्रीमान सुरेशजी पवार ( संपर्क _ ९४२३५५६७२८ , ९९७०९०४७२८ ) , २३ संस्थांचे ४० पदाधिकारी , सभासद व हितचिंतक . 🌹🌷👏💐🌈✒️ सावळीराम तिदमे ,श्रीक्षेत्र नाशिक .८००७९७५७६० .
