
भालुर ( प्रतिनिधी) म.वि.प्र. संचालित जनता विद्यालय भालूर येथे नुकत्याच झालेल्या इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेत
विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागलेला असून निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे.
ए ग्रेड मध्ये सहा विद्यार्थी
बी ग्रेड मध्ये पाच विद्यार्थी
सी ग्रेड मध्ये 24 विद्यार्थी
असे एकूण 35 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयातील चित्रकला शिक्षिका श्रीमती पाटील एस आर मॅडम
यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचा विद्यालयात सत्कार करण्यात आला.
प्रसंगी विद्यालयातील मुख्याध्यापक
श्री वैद्य सर सर्व शिक्षक ,शिक्षिका शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कचरू नाना आहेर
तालुका संचालक अमित भाऊ पाटील यांनी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना आणि मार्गदर्शिका पाटील मॅडम यांना शुभेच्छा दिल्या.
