
आसरखेडे ( दि. 15/ जनता विद्यालय आसरखेडे येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडास प्रारंभ झाला असुन त्यानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पुजन व कवीवर्य विवा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ कापडनीस सी. आर. यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे व आपल्या मातृभाषेचा अधिक प्रसार करावा असे मत मुख्याध्यापिका सौ कापडनीस यांनी व्यक्त केले. कार्यक्रमांसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

