
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१५३ वा दिवस
हे काही एका दिवसाचे काम नाही. मार्ग तर भयंकर काट्याकुट्यांनी भरलेला आहे. पण जो पार्थाचा/अर्जुनाचा सारथी झाला तो आपल्यालाही मार्ग दाखवायला सिद्ध आहे. जो अकिंचन गोपालांचा सखा झाला, अन्त्यज गुहाकाला ज्याने स्नेहभराने अलिंगन दिले, बुद्धावतारात भल्याभल्यांची निमंत्रणे बाजूला सारून ज्याने वेश्येची निमंत्रण स्वीकारले आणि तिचा उद्धार केला त्या भगवान पार्थसारथीच्या मंदिरात जा. त्यांच्या शुभचरणी नतमस्तक व्हा आणि आपले सारे जीवन समर्पण करा! भगवान पुनःपुन्हा ज्यांच्यासाठी अवतार घेतात त्यांच्या कारणी ते जीवन लागू द्या! दीन, पतित, अत्याचारीत यांचा तो कैवारी. तुम्हीही प्रतिज्ञा करा, की दिवसेंदिवस गर्तेत चाललेल्या त्या पददलितांसाठी आम्ही आमचे जीवन अर्पण करू !
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर पौष २७ शके १९४७
★ पौष वद्य /कृष्ण १४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. १७ जानेवारी २०२६
★ १९७१ स्वातंत्र्य सैनिक तथा घटनातज्ञ बॅरिस्टर नाथ पै यांचा स्मृतीदिन
★ १९५६ बेळगाव, कारवार, धारवाड आणि बिदर जिल्ह्यातील मराठी भाषिक प्रदेश म्हैसूर (कर्नाटक) राज्याला जोडण्यात आला.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
