



नांदगाव,दि. 17 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांतीच्या निमित्ताने जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल नांदगाव. येथे नुकताच एक स्नेहपूर्ण हळदी-कुंकू समारंभ प्री- प्रायमरी विभागाच्या महिला पालकांसाठी आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये महिला पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या सरचिटणीस सौ प्रमिलाताई कासलीवाल तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती तसेच साविञीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलन झाली.
यानंतर महिला पालकांना हळदी-कुंकू लावून त्यांचे स्वागत करण्यात आले आणि त्यांना तिळगूळ व सुवासिनी म्हणून विविध वस्तू वान(उदा. भांडी, हळद-कुंकू) भेट देण्यात आल्या.यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणयात आले होते. यामध्ये रॅम ऑक, उखाणे, पारंपरिक खेळ आणि स्पर्धाही आयोजित केल्या होत्या. सांस्कृतिक विभाग प्रमुख सुवर्णा अव्हाड यांनी या कार्यक्रमाचा उद्देश पालक-शिक्षक संबंध दृढ करणे आणि शैक्षणिक वातावरणात सकारात्मकता आणणे हा असल्याचे यावेळी सांगितले.या कार्यक्रमातून पारंपरिक संस्कृतीचे जतन आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला, असे मत उपस्थित महिला पालकांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी स्पर्धेमध्ये विजेत्या महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून सौ.योगिता गायकवाड व सुवर्ण आव्हाड यांनी काम पाहिले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सुपरवायझर सौ. रिटा उबाळे, सर्व शिक्षक आणि पालक वर्ग यांचे आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्री- प्रायमरीच्या शिक्षिका सौ अश्विनी देसले,पूजा अहिरे तसेच शोभा निकम यांनी तर आभार सुवर्णा काळे यांनी मानले.
या कार्यक्रमास संस्थेच्या सरचिटणीस सौ. प्रमिलाताई कासलीवाल पुष्पा चांदिवाल,सुनिता चोपडा, विनया चव्हाण,कविता आहेर, निषमा मेघावत, महिला पालक उपस्थित होत्या.
