
नासिक- (प्रतिनिधी )यशस्वी उद्योजक होण्यासाठी नवनिर्मिती दृष्टिकोन महत्वाचा असल्याचे प्रतिपादन महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कॉलेज ऑफ मॅनेजमेंट & टेक्नोलॉजीचे संचालक प्राचार्य डॉ.दिलीप शिंदे यांनी केले.नाशिक येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (दि.१६ रोजी) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या उद्योजकता विकास कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.संजय सानप होते.कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले,क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व पूजन करून झाली.याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.पौर्णिमा बोडके,विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.शरद काकड,वाणिज्य विभागप्रमुख डॉ.धीरज झालटे,प्रा.हेमलता दराडे,डॉ.अर्चना हत्ते,प्रा.वैशाली वाघ,प्रा.रोहिणी भालेराव,प्रा.महेश आव्हाड,प्रा.रेश्मा कुटे,प्रा.कुवरजीत सिंग धाडयाल यांच्यासह विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते

.कार्यशाळेत बिटको महाविद्यालयातील प्रा.डॉ.विदुलता हांडे,युवा उद्योजक उत्कर्ष मोरे यांनीही विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.याप्रसंगी अधिकचे मार्गदर्शन करतांना डॉ.दिलीप शिंदे म्हणालेकी प्राप्त परिस्थिती विचारात घेता नोकऱ्यांची संख्या खूप कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यापार,उद्योग -व्यवसाय सुरू करण्याची मानसिकता तयार करावी,ग्राहकांच्या गरजा ओळखून व्यवसाय सुरू करावा,उद्योजक होण्यासाठी धोका स्वीकारण्याची क्षमता ठेवावी,आपले गाव अथवा शहर सोडून रोजगारासाठी बाहेर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे,विद्यार्थ्यांनी आपल्यातील गुण शोधून त्यांचा विकास करावा,जीवनात येणाऱ्या अडचणीवर मात करावी.दुसर्या सत्रात मार्गदर्शन करतांना प्रा.डॉ.विदुलता हांडे यांनी उद्योजकतेच्या महत्वाच्या पाच पायर्या समजावून सांगितल्या,तसेच विद्यार्थ्यांनी स्वताला ओळखण्यास तसेच काळाची पाऊले ओळखन्यास शिकावे असे त्या म्हणाल्या.तिसर्या सत्रात मार्गदर्शन करतांना युवा उदयोजक उत्कर्ष मोरे म्हणालेकी काळाची पाऊले ओळखून उद्योगाविषयी विद्यार्थ्यांनी मानसिकता तयार केली पाहिजे,आलेल्या परिस्थितीस सामोरे जायला शिकले पाहिजे,संकटांचा सामना करण्याची क्षमता आपल्यात निर्माण करून अनुभवातून शिकत पुढे पुढे जावे.अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.संजय सानप म्हणालेकी अनुभवावर आधारित शिक्षण घेणे काळाची गरज बनली आहे,लोकांच्या गरजा ओळखून उद्योग व्यवसाय विद्यार्थ्यांनी सुरू करावीत,वाणिज्य शाखा राबवत असलेले उपक्रम कौतुकास्पद असून पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रात्याक्षिक ज्ञान मिळवणे महत्त्वाचे आहे.वाणिज्य विभागप्रमुख प्रा.डॉ.धीरज झालटे यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेची भूमिका विषद करून विद्यार्थ्यांमध्ये रोजगार विषयक कौशल्य विकसित व्हावे,स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी व सर्वांगीन विकासासाठी आगामी काळात नाविन्य पूर्ण उपक्रम घेण्याचा मानस व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रोहिणी भालेराव यांनी चांगल्या प्रकारे करून कार्यक्रमात रंगत आणली.पाहुण्यांचा परिचय प्रा.हेमलता दराडे यांनी करून दिला,तर आभार प्रा.वैशाली वाघ यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य व वाणिज्य विभागप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक तसेच निलेश आहेर,गोकुळ काकड,रोशन सावंत,सुयश मराठे,जयेश चित्ते,अक्षदा बोडके,काजल गांगुर्डे,सुहानी गवते,सायली नागरे,दुर्गेश गडकरी,सिद्धि आव्हाड,वर्षा फासळे,पार्वती बेंडकुळे,कल्याणी ठाकुर,पायल शिंदे,दुरगेश गांगुर्डे,साक्षी कोळी आदि विद्यार्थी प्रतीनिधीसह सोमनाथ धात्रक,निलेश महाजन,किरण साबळे आदींनी परिश्रम घेतले.व्ही.एन.नाईक महाविद्यालयात उद्योजकता विकास कार्यशाळेस मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ.दिलीप शिंदे
