
मुळडोंगरी (प्रतिनिधी ) संत सेवालाल महाराज संचालित सरस्वती माध्यमिक विद्यालय, मूळडोंगरी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक येथे अंतर्गत शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका सौ. बोरसे एस. एस. मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या आरोग्य तपासणीसाठी तज्ञ डॉक्टर स्मिता खैरनार व डॉक्टर प्राची हादगे यांनी विद्यार्थ्यांची सर्वांगीण आरोग्य तपासणी केली. यामध्ये विद्यार्थ्यांचे वजन, उंची, दृष्टी, दंत तपासणी तसेच सामान्य आजारांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना स्वच्छता, संतुलित आहार व आरोग्याची काळजी घेण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून पालक व शिक्षकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
