
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१५० वा दिवस
आपले ध्येय सुदूर असले पाहिजे तरीही ते प्राप्त करण्याची आकांक्षा मात्र आपल्या मनात सदैव जागी असली पाहिजे. सभोवताली लोक अंधारात चाचपडत आहेत त्यांच्या डोळ्यासमोर काही ध्येयच नाही. समोर काही ध्येय ठेवून काम करणारा मनुष्य हजार चुका करीत असेल असे गृहीत धरले तर ध्येयशून्य माणूस पन्नास हजार चुका करू शकतो. म्हणून डोळ्यासमोर काही ध्येय असणे फार आवश्यक आहे. सतत ध्येयचिंतन करणे, ध्येयश्रवण घडणे यातूनच तनात, मनात, जीवनात ध्येयाचा संस्कार दृढ होतो. ध्येयाचे स्फुरण आपल्या नसांमधून, रक्ताच्या प्रत्येक थेंबाथेंबातून आणि रोमारोमांतून वाहू लागते. जेव्हा हृदय ध्येयाच्या विचाराने भरून उधळत असते तेव्हा शब्दही तसेच उमटतात आणि कृतीही प्रेरित होते.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर पौष २४ शके १९४७
★ पौष वद्य /कृष्ण ११
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. १४ जानेवारी २०२६
★ षट्तिला एकादशी 🚩🚩🚩🚩🚩
★ संत निवृत्तीनाथ यात्रा त्र्यंबकेश्वर
★”मकर संक्रांत”
★”सुर्याचा मकर राशीत प्रवेश”
★”भूगोल दिन” (१९९६ पासून)
★ १७६१ पानिपतच्या ऐतिहासिक रणसंग्रामात मराठ्यांचा अचाट पराक्रम. “मराठा शौर्यदिन”
★ १७६१ पानिपत रणसंग्रामात सरसेनापती सदाशिवराव पेशवे यांचे हौतात्म्य (स्मृतीदिन)
★ १७६१ पानिपतच्या रणसंग्रामात नानासाहेब पेशवे यांचे चिरंजीव विश्वासराव यांचे हौतात्म्य.
★ १८९६ भारताचे पहिले अर्थमंत्री, रिझर्व्ह बॅंकेचे पहिले भारतीय गव्हर्नर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख यांचा जन्मदिन
★ १९४८ लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरु झाले.
★ मकर संक्रांतीच्या सर्वांना गोड गोड शुभेच्छा
★ तिळ गुळ घ्या गोड गोड बोला, आमचा तिळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका.
