
सिन्नर. ( प्रतिनिधी) नाशिक पुणे रेल्वे रेल्वे प्रस्तावीत मार्ग हा सिन्नर संगमनेर आळेफाटा नारायणगाव चाकण मार्गेच व्हावा.व नवीन प्रस्तावीत मार्ग रद्द करण्यात यावा.यासाठी सिन्नर रेल्वे कृती समितीच्या वतीने येथील तहसिल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आली.
या आंदोलनात तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन
संभाव्य नवीन रेल्वेमार्ग रद्द न केल्यास तालुक्यातील जनतेला बरोबर घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला.

जुना प्रस्तावीत केलेला रेल्वे मार्ग हा तालुक्यातील लक्षावधी नागरिकांसाठी व लाभदायक असुन सदर मार्गामुळे सिन्नर सह संगमनेर व इतर परिसराचा औद्योगिक.शैक्षणिक व आर्थिक विकास साधला जाईल.असे कृती समितीने नायब तहसीलदार माणिक गाडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत नवीन प्रस्तावित रेल्वे मार्ग कदापीही सहन केला जाणार नसल्याने रस्त्यावरच्या लढाईसाठी तालुक्यातील जनता जनमताचा रेटा ऊभा करतील.
असे ही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी हरिभाऊ तांबे बबनराव वाजे.. राजेंद्र चव्हाणके. महामित्र दत्ता वायचळे नामदेवराव कोतवाल अण्णासाहेब गडाख. अॅड संजय सोनवणे राजाराम मुंगसे. डॉ आर टी जाधव. आदींनी केंद्र व राज्य सरकारने लोकभावनेची कदर करून नवीन रेल्वे मार्ग लादल्यास तालुक्यात मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल.आदींनी यावेळी भाषणात सांगितले.नगराध्यक्ष विठ्ठल ऊगले भाऊसाहेब शिंदे डॉ विष्णु अत्रे संतोष दातरंगे.पप्पु गोडसे दिपक सोनवणे आनंदा सालमुठे मंगेश आहेर किरण मुत्रक रामदास खैरनार कृष्णा भगत कमलाकर पोटे कल्पना रेवगडे सतीश नेहे सर्जेराव ऊगले सोमनाथ सानप डॉ दिपक श्रीमाळी संदीप शेळके कृष्णा पोटे संजय चव्हाणके उमेश गायकवाड दशरथ रोडे आनंदा सोनवणे शिवाजी आवारे अनिल थोरात विजय शिंदे मुकेश देशमुख नगरसेवक अशोक जाधव दौलतराव मोगल विजय मुठे विजय बर्डे आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते.
