
सिन्नर ( प्रतिनिधी ) १३ जानेवारी २०२६ आद्यक्रांतिकारक तिलका मांझी यांच्या २४१ व्या शहिद दिनानिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.
बाबा तिलका मांझी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सुञसंचलन रुपेश मुठे यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी तिलक मांझी यांच्या कार्याबद्दल माहिती देताना म्हणाले की
बाबा तिलका मांझी यांनी जल जमीन जंगल वाचवण्यासाठी जमिनदार व ब्रिटिशांविरुद्ध मोठी लढाई लढली तिलका मांझी यांनी लोकांना एकत्र करून जमिनदार व ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले १७७१ ते १७८४ ला झारखंडमध्ये राजमहल येथे जमिनदार व ब्रिटिशांना सळोकीपळो करून सोडले होते.त्यामुळे ब्रिटिश, जमिनदार तिलका मांझींच्या विरोधात एक झाले होते.त्यांनी भागलपूरच्या कलेक्टर कडे तक्रार केली.कलेक्टर क्वीवलेंड यांनी तिलका मांझीचा बंदोबस्त करण्याचं ठरवलं पण तिलका मांझींच्या उग्र बंडामुळे कलेक्टर मारला गेला.त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांची धास्ती खाली काही दिवसांनी इंग्रज अधिकारी आयरकुट याच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी मोठी फौज पाठवली त्यांनी आखलेल्या जाळ्यात तिलका मांझी अडकले व पकडले गेले.

त्यांना पकडून घोड्याच्या पाठीमागे बांधून फरपटत भागलपूर शहराच्या चौकात आणले गेले.तेंव्हा तिलका मांझी यांनी मोठ्या जोशात ब्रिटिश सत्तेला आव्हान दिलं.त्यांच्या भितीने आणि आदिवासींना दहशत बसवण्याच्या उद्देशाने ब्रिटिशांनी तिलका मांझींना वडाच्या झाडावर लटकावून त्यांना फासी देण्यात आले.तिलका मांझी भारतीय स्वातंत्र्यासाठी शहिद झाले.देशासाठी शहिद होणारे पहिले १३ जानेवारी १७८५ ला फासावर जाणारे क्रांतिकारक तिलका मांझी होते.अशा आद्यक्रांतिकारकास विनम्र अभिवादन! या कार्यक्रमासाठी उपस्थितांचे आभार दौलत कुंदे यांनी मानले
यावेळी अभिवादन करण्यासाठी अभिशा वायचळे,अंकिता मुठे सुवर्णा कुंदे आर्वी इदे महामित्र दत्ता वायचळे, माजी नगरसेवक रूपेशभाऊ मुठे, आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे, दौलत कुंदे बाळासाहेब मुठे रामचंद्र इदे सुनिल गुरुकुले राजेंद्र बेंडकुळे प्रकाश गुंजाळ आदि उपस्थित होते.
