
नांदगाव ( प्रतिनिधी ) कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजीएट) परीक्षेत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ,संचालित व्ही.जे.हायस्कूल नांदगाव शाळेने दोन्ही परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.या परीक्षेत राज्यभरातून व इतर राज्यातून लाखो विद्यार्थी या परीक्षेत भाग घेत असतात. एलिमेंटरी परीक्षेत शाळेचे 69 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते या परीक्षेचा ९८ टक्के निकाल लागला . यात अ श्रेणीत ३१,ब श्रेणीत २० व क श्रेणीत १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले .तसेच इंटरमिजीएट परीक्षेचा १०० टक्के निकाल लागला परीक्षेत ५५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते यात अ श्रेणीत २९,ब श्रेणीत १३, व क श्रेणीत १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थांना कलाशिक्षक विजय चव्हाण,चंद्रकांत दाभाडे,ज्ञानेश्वर डंबाळे,शशिकांत खांडवी यांनी मार्गदर्शन केले .
या मिळविलेल्या यशस्वी विद्यार्थांचे शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे ,मुख्याध्यापक लक्ष्मीकांत ठाकरे, उपमुख्याध्यापक जोगेश्वर नांदूरकर, टी.एम.भास्कर मधे,गुलाब पाटील,रुपाली झोडगेकर, मुकुंद बागुल, तसेच शाळेतील सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी कौतुक केले.
