
नाशिक ( प्रतिनिधी ) ता १७ – छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी. शाहीरांनी डफावर थाप मारत. पोवाडे गायले. वासुदेवाने भल्या पहाटे गीत गायीले. नंदी बैलवाल्यांनी वर्षातून एकदा गावागावात फिरून जनजागृती केली. एका तारेवरची कसरत करत डोंबाऱ्यांनी जगण्याचा मंत्र शिकवला. निसर्गाच्या सानिध्यात गायी चालणाऱ्या गुराखीने आपल्या बासरीच्या मधुर ध्वनीने रमणीय सायंकाळ मंत्रमुग्ध केली.

अशा अनेक संस्कृती आजही थोड्या प्रमाणात टिकून आहेत. शहरी व ग्रामीण भागात या संस्कृतींचा आता विसर पडत चालला आहे. असे प्रतिपादन गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित चौथ्या अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका अलका दराडे यांनी केले. पंचवटीतील भावबंधन मंगल कार्यालयात संमेलन दोन दिवस अठ्ठेचाळीस तास सतत संमेलन चालणार आहे..
यावेळी व्यासपीठावर संमेलनाच्या प्रमुख पाहुण्या तमाशा साम्राज्यनी डॉ. रेश्मा परेतीकर. स्वागत अध्यक्ष सुनंदा पाटील. बाळासाहेब मगर. प्र द कुलकर्णी. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार. शकुंतला वाघ. निवृत्त पोलीस उपायुक्त डॉ. सिताराम कोल्हे. श्रीकांत बेणी. पुंजाजी मालुंजकर. पर्यटन विभागाचे उपसंचालक नंदकुमार राऊत. यशवंत पाटील. विजयकुमार मिठे. वसंतराव खैरनार. लक्ष्मण महाडिक. विवेक उगलमुगले. आदी होते.

संमेलनाच्या अध्यक्ष दराडे पुढे म्हणाल्या ” साहित्य म्हणजे माणसाच्या अंतर्मनातील जागृत संवेदना होय. ज्या त्याच्या हातून सहजपणे कागदावर उमटल्या जातात. साहित्य कविता. नाटक. ललित.आत्मचरित्र. व ग्रामीण साहित्य अशा अनेक प्रकार आहेत. साहित्य हा समाजाचा आरसा असतो. कारण समाजात घडणाऱ्या गोष्टींचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात दिसून येते.”
तर संमेलनाच्या स्वागताध्यक्ष सुनंदा पाटील म्हणाल्या ” गिरणा गौरव प्रतिष्ठान सामाजिक सांस्कृतिक व साहित्यिक विद्यापीठ अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतीय संस्कृतीतील सण उत्सव परंपरा लोकसंस्कृती लोप पावत आहे. तमाशा पोवाडा आदिवासी लोककला गोंधळी टिंगरीवाला पावरी नृत्य नंदीबैल नृत्य अशा विविध लोककला जिवंत ठेवण्यासाठी लोककला साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. लोककलेला ह्या व्यासपीठावर जागर व सन्मान मिळतो.
प्रमुख पाहुण्या तमाशा साम्राज्ञी डॉ रेश्मा परेतनीकर म्हणाल्या ” आमच्यासारख्या लोककलावंताच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटनाचा मान दिला. हा सन्मान कलावंतांचा खास ठेवा आहे.
संमेलनाच्या प्रारंभी साहित्याच्या पालखीची मिरवणूक. काढण्यात आली. सुरेखा मैड यांनी वासुदेव नृत्य केले.” दिवा मी लाविला चंद्र सूर्याचा.” असे जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला. ललित भावसार यांनी खानदेशी गाडी घुंगराची. या गाण्यावर नृत्य केले. लावणी स्पर्धा. तसेच (उमराणे ता देवळा )येथील कलगी तुरा शाहीर बाजीराव सोनवणे. दादाजी देवरे. बाबूलाल देवरे. शरद देवरे.बाळू देवरे. राजू पवार. शिवाजी गायकवाड.ईश्वर देवरे. यांनी शिवपुराणाचा आशय घेऊन कलगी तुरा शाहिरीतून व्यक्त केला.
संमेलनाचे प्रास्ताविक बाळासाहेब मगर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सुरेश पवार यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले.
