
मुक्ताईनगर : (बबनराव आराख) शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण मधुकर उज्जैनकर यांना नुकताच भारत सरकार आणि निती आयोग नोंदणीकृत ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित ग्राहक रक्षक समिती तर्फे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार 2026 साठी नुकतीच निवड करण्यात आली.ही निवड ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.सौ.आशाताई पाटील,नाशिक यांच्या कडून तशा प्रकारचे निवड पत्र डॉ.उज्जैनकर यांना नुकतेच प्राप्त झाले. हा सन्मान 8 फेब्रुवारी 2026 रोजी सेलिब्रिटा हॉटेल, अंध शाळा बस स्टॉप समर्थ बाजार जवळ नाशिक रोड नाशिक येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचे शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक कार्य उभ्या महाराष्ट्राला सुपरीचीत आहे ते शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष असुन ते नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहेत हा राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तसेच गोवा व कर्नाटक, मध्य प्रदेश राज्यातील सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
