
नाशिक, ( प्रतिनिधी ) दिनांक १३ जानेवारी :- नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथे रविवार दिनांक ११ जानेवारी ते १५ जानेवारी, २०२६ दरम्यान आयोजित ३५ वर्षे आणि त्यावरील विविध नऊ वयोगटाच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेच्या आजच्या तीसऱ्या दिवशी विविध गटांचे सामने खेळविले गेले. नाशिकच्या गंगापूर रोड येथील केन्सिंगटन क्लब येथे सुरु असलेल्या या स्पर्धेमध्ये आज खेळल्या गेलेल्या पुरुषांच्या ६० वर्षे वरील गटामध्ये दुहेरी प्रकारात नाशिकचे भ्रमर सेंगर आणि छत्रपती संभाजीनगरचे गुरुमितसिंघ मथारू यांनी सुंदर खेळाचे प्रदर्शन करून अंतिम लढतीत मुंबई उपनगरच्या मानेक दारूवाला आणि रेमंड रोड्रिगेस यांचा २१-१४ आणि २१-१६ असा २-० ने पराभव करून या गटाचे दुहेरीचे विजेतेपद आपल्या नांवे केले. पुरुषांच्या ५५ वर्षे गटामध्ये एकेरी प्रकारात मुंबईच्या शैलेश डागा यांनी अंतिम लढतीत रायगडच्या प्रशांत मुखर्जी यांना २१-०६ आणि २१-१३ असे पराभूत करून या गटाचे विजेतेपद मिळविले. महिलांमध्ये ५५ वर्षे गटात अटीतटीच्या अंतिम लढतीत मुंबई उपनगरच्या कविता जैन यांनीं पुणेच्या संजीवनी महाजन यांचा पहिला सेट गंमावल्यानंतरही नंतरचे दोन सेट जिंकून या गटाचे विजेतेपद मिळविले. आज ३५ वर्षे, ४० वर्षे, ४५ वर्षे, ५० वर्षे या वयोगटाच्या स्पर्धांना सुरवात झाली. *नाशिकच्या खेळाडूंची उत्तम कामगिरी* : आज खेळल्या गेलेल्या ३५ वर्षे गटामध्ये एकेरी प्रकारात नाशिकच्या सुजय आघारकर याने ठाणेच्या आनंद कोकाटे याचा १५-०६, १५-०६ असा पराभव करून विजयी सलामी दिली. याच गटामध्ये नाशिकच्या नीरज कोठारी याने पुणेच्या तुषार गोंडके याचा १५-०५ , १५-०२ असा सहज पराभव केला. पुरषांच्या ४० वर्षे गटामध्ये एकेरी प्रकारात नाशिकच्या चंदन जाधव याने ठाणेच्या तुषार पहारिया याचा १५-०३, १५-०५ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून आपले विजयी अभियान सुरु केले. पुरुषांच्या दुहेरी प्रकारात ३५ वर्षे गटामध्ये नाशिकच्या चंदन जाधव आणि हर्षद टेम्भूर्णेकर या जोडीने आनंद साबू( पुणे) आणि पालक वालेजा (नाशिक) यांना २-० असे पराभूत करून विजय मिळविला. ४० वर्षे गटामध्ये पुरुष दुहेरी प्रकारात नाशिकच्या सचिन पाटील आणि विशाल करंजकर या जोडीने सुंदर खेळ करत मुंबई उपनगरच्या गिनेस शिंदे आणि वीरेंद्र तावडे यांना १५-०३, १५-०६ असे सहज पराभूत करून आपला पहिला विजय नोंदवला. पुरुषांच्या याच गटामध्ये नाशिकचे अमित देशपांडे आणि पुणेचे आदित्य उमराणी यांनी आपल्या पहिल्या सामन्यात नाशिकच्या प्रशांत प्रजापती आणि विवेक कुमार यांना पराभूत केले. मिश्र दुहेरी प्रकारात ४० वर्षे गटामध्ये नाशिकच्या आशिष तोरणे आणि वृषाली सोनावणे यांनी मुंबईच्या मनीष कुमार आणि अनघा देशमुख यांना अटीतटीच्या लढतीत १५-०८, ०५-१५, १५-३ असे २-१ च्या फरलकाने पराभूत करून पुढील फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. पुरुषांच्या ३५ वर्षे गटामध्ये अमोल हिंदळेकर (मुंबई),निनाद कामत (कोल्हापूर), सुशांत ठोसर (मुंबई उपनगर) अभिनव कुंडलवार ( नागपूर), मनीष चौधरी (मुंबई उपनगर, क्षितिज अवस्थी (सांगली), जसविंदर (सिंग मुंबई), यांनीही आपले पहिले सामने जिंकून चांगली सुरवात केली. ४० वर्षे गटामध्ये पियुष अग्रवाल(रायगड), दिव्यचंद्र सूर्यवंशी (पुणे), सचिन बसते (जळगाव), मधू नंजुंदास्वामीय (पुणे) दीपक जेटली (मुंबई),बाळकृष्ण भावे (नागपूर) यांनीही आपले पहिले सामने जिंकून पुढे आगेकूच केली. विविध गटामध्ये विजयी खेळाडूंना प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र प्रदान करून गौरवण्यात आले. या स्पर्धा महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या अधिकृत नियमावलीनुसार खेळविल्या जात आहेत. या स्पर्धेला “योनेक्स सनराईस” यांनी पुरस्कृत केले आहे. या स्पर्धाच्या सूत्रबद्ध आयोजनासाठी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अरुण लाखनी, कार्याध्यक्ष शिरीष बोराळकर, उपाध्यक्ष मंगेश काशीकर, राज्य सचिव सिद्धार्थ पाटील, उपाध्यक्ष सुधीर गाडगीळ, पंकज ठाकूर, ओंकार हजारे, मुंबईचे सचिन भारती, नाशिक बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम मुंदडा, सचिव पराग एकांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. शर्मिला कुलकर्णी, उपाध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष योगेश एकबोटे, सहसचिव दिलीप लोंढे, खजिनदार समीर रहाळकर,कार्यकारी सदस्य चंदन जाधव, संदीप म्हात्रे आदी परिश्रम घेत आहेत. याचबरोबर डॉ. सुचिता बच्छाव, अश्विन सोनावणे, विशाल शाह, उदय एकांडे, प्रमोद रानडे, अनंत जोशी, रिषभ गोलिया, आदित्य आर्डे, हर्षद टेम्बुर्णीकर आदी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

आजचे निकाल
अंतिम सामने :- निकाल* पुरुष दुहेरी –
१) ६० वर्षे – भ्रमर सेंगर (नाशिक) आणि गुरमितसिंघ मथारू (छ. संभाजीनगर)विजेते
२) मेनेक दारूवाला आणि रेमंड रोड्रिगेस (मुंबई) – उपविजयी
२) ७० वर्षे – संजय परांडे आणि शरद महाजन (पुणे- नागपूर) विजेते
२) राजेंद्र बेदमुथा आणि राजीव वैशपायन (नाशिक आणि ठाणे ) – उपविजयी

आज झालेल्या सामन्यांचे निकाल :
१) पुरुष गट -३५ वर्षे –
१) अमोल हिंदळेकर (मुंबई) विजयी विरुद्ध महिंद्र वानखडे ( चंद्रपूर)
२) निनाद कामत ( कोल्हापूर विजयी विरुद्ध आनंद साबू (पुणे)
३) निनाद कामत (अभिनव कुडलकर(नागपूर ) विजयी विरुद्ध रवी तिवारी (पुणे
४)नीरज कोठारी(नाशिक) विजयी विरुद्ध तुषार गोंडके (पुणे)
५) चंदन जाधव (नाशिक) विजयी विरुद्ध तुषार पहारिया (ठाणे)

मेन्स डबल्स :-
१) ३५ वर्षे चंदन जाधव आणि हर्षद टेम्भूर्णीकर(नाशिक) विजयी विरुद्ध आनंद साबू आणि पालक वालेजा ( मुंबई-नाशिक )
२) आदित्य उमराणी आणि अमित देशपांडे विजयी विरुद्ध प्रशांत प्रजापती आणि विवेक कुमार (नाशिक)
३) विशाल करंजकर आणि सचिन पाटील विजयी विरुद्ध गणेश शिंदे आणि वीरेंद्र तावडे ( मुंबई)

