
नाशिक (प्रतिनिधी) लहान मुलाच्या नजरेतुन बालसाहित्याची निर्मिती व्हायला हवी असे प्रतिपादन संतोष हुदलीकर यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे पुस्तकावर बोलू काही या अभिनव उपक्रमात २१९ वे पुष्प गुफताना संतोष हुदलीकर ‘फंटुश गाणी’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजित कुलकर्णी होते.
संतोष हूदलीकर पुढे म्हणाले की,
पक्षी, प्राणी याच्या राहण्याची जागा वेगवेगळ्या आहेत. त्याचे वर्णन करत असताना लहान मुलासाठी कथा कवीता, गाणी लिहताना आजची परिस्थिती आणि मागची परिस्थिती यातील फरक बदल माडताना नवीन विडबंन गाणी तयार करताना मुलांना आवडतील असे प्रसग बालसाहित्यात माडले आहेत.
मोदक कसले खाता देवा आता पिझ्झा खाऊन बघा अशा कविता मधून आधुनिक परिस्थितीचा अगीकार बालसाहित्यात प्रामाणिकपणे माडले आहे.
यावेळी दता दाणी,सुहास टिपरे यां भाग्यवान श्रोत्यांना ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
आभार मधुकर गिरी यांनी मानले, सूत्रसंचालन सुरेश पवार यांनी केले. दरम्यान येत्या शुक्रवार १६ जानेवारी रोजी डॉ. सुरेश वाघचौरे थडग्यातला सूर्य या पुस़तकावर डॉ. सुरेश वाघचौरे ऐसपैस गप्पा करणार आहेत.
