
मनमाड (प्रतिनिधी )नाशिक मराठा विद्या प्रसारक समाजाचे आदर्श इंग्लिश मेडीयम मध्ये मकरसंक्रांत सण आनंदात साजरा करण्यात आला.त्याचबरोबर अनेक प्रकारची पतंग विद्यार्थ्यांनी बनवून ते पतंग उडवण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला आनंदमय वातावरणात शाळेच्या मुख्याध्यापिका शितल आहेर यांनी विद्यार्थ्यांना मकरसंक्राती सणाची माहिती देऊन पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा चा वापर का करु नये याबाबत माहिती दिली. शिक्षक ,विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारीनी देखील नायलॉन मांजा न वापरण्याची प्रतिज्ञा घेतली.

त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांना तिळगुळ देत गोडवा निर्माण केला. व सर्वञ आपसात शुभेच्छांचा वष्राव केला तिळगुळ घ्या गोड गोड बोला
कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी सहकार्य केले
