
नाशिक( प्रतिनिधी ) दि एज्युकेशन इन्स्टिट्यूट,नाशिक संचलित यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,नाशिक या शाळेत आज मंगळवार दि.१३/०१/२०२६ रोजी भूगोल दिन व भोगी सण साजरा करण्यात आला.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सुनिता बाजपेयी मॅडम उपमुख्याध्यापक मा.श्री राजेंद्र सोमवंशी सर व मा.श्री मिलिंद कोठावदे सर यांच्या हस्ते पृथ्वीच्या भूगोल गोलास पुष्पहार अर्पण करण्यात आले.

शाळेचे उपमुख्याध्यापक मा.श्री राजेंद्र सोमवंशी सरांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतातून भूगोल दिनाचे व भोगीचे महत्त्व विशद केले.तसेच काही विद्यार्थिनींनी भूगोल दिन व मकरसंक्रांतीच्या भोगीची माहिती दिली.कार्यक्रमाचे नियोजन सौ.लता शिंदे मॅडम,सौ.रंजना खैरनार मॅडम,श्री मुकणे सर यांनी केले.सुत्रसंचालन कु.ईश्वरी खरे व कु.स्वरा बोरसे यांनी तर आभारप्रदर्शन कु.श्रावणी कोठावदे हिने केले.फलकलेखन सौ.सायली मुळे मॅडम यांनी केले.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री प्रकाश वैशंपायन साहेब,उपाध्यक्ष मा.श्री प्रभाकर कुलकर्णी साहेब,सेक्रेटरी मा.श्री हेमंत बरकले सर,शालेय समिती चेअरमन मा.श्री रमेश महाशब्दे साहेब,यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सुनिता बाजपेयी मॅडम,अधिक्षिका मा.सौ.मीना वाळूंजे मॅडम,उपमुख्याध्यापक मा.श्री राजेंद्र सोमवंशी सर व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक मा.श्री मिलिंद कोठावदे सर,पर्यवेक्षिका सौ.सुषमा गवारे मॅडम,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री कैलास बागुल सर,सौ.भारती चंद्रात्रे मॅडम,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनींनी उपस्थित होते.
