
नांदगाव ( प्रतिनिधी) मविप्र समाजाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने वाखारी येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रम संस्कार शिबीर दिनांक ८/१/२०२६ ते १४/१/२०२६ पर्यंत होत आहे. सहाव्या दिवशी पहिल्या सत्रात रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी डॉ. बी.एम.आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात स्वयंसेवकांच्या सहा गटांद्वारे पाणलोट क्षेत्र व जमीन व्यवस्थापन, महिलांच्या समस्या, एड्स जनजागृती, लोकसंख्या वाढ व त्याच्या समस्या एन.एस.एस.वर आधारित पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली.

तसेच प्रा.एस.एस.नारायणे सरांनी शिबीरास भेट दिली असता विद्यार्थ्यांशी एकात्म मानववाद या विषयावर मार्गदर्शन केले.महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाद्वारे गावातील ८५ ग्रामस्थ व स्वयंसेवकांची रक्तगट तपासणी करण्यात आली. आज महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. एस.ए. मराठे, प्रा.डॉ. किरणकुमार खंदारे, डॉ. व्ही.ए. घागरेपाटील, प्रा.आर.टी. बिन्नर, प्रा. एस.जे.कर्वे, प्रा. एस.एन.भागवत, प्रा.श्रीमती व्ही. गोराडे, प्रा.श्रीमती पी. एस. कडलग, डॉ. पी. एन. जाधव, प्रा.ए.एम. लवाटे यांनी भेट दिली. दुसऱ्या बौद्धिक सत्रात महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा.एम.बी. अटोळे यांनी स्वयंसेवकांना स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा परिषद मुख्याध्यापक प्रशांत जयसिंग आहिरे, रा.से.यो. सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ.डी.डी. ठाकरे, प्रा.श्रीमती पी.डी. पाटील, श्री विलास आहेर, श्री गोरख काकळीज, बी.एम. सुर्यवंशी, श्री बाबासाहेब दळे, श्री एल.डी. बहिकर, श्री बी.के. निकम, श्री निलेश सोनवणे, श्री सचिन पवार, श्री शंकर थोरात व स्वंयसेवक उपस्थित होते.
