
नाशिक ( प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने दिनांक १४ ते २८ जानेवारी २०२६ पर्यंत *मराठी भाषा संवर्धन पंधरवडा* साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिकरोड यांच्या संयुक्त विद्यमाने सादर उपक्रम राबविण्याचे ठरले आहे.उपक्रमात सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी विभागीय आयुक्त कार्यालय आवारात ग्रंथ प्रदर्शन भरवण्याचे ठरले आहे. सकाळी ८.०० वाजे पासून दुपारी ४.०० वाजेपर्यंत ग्रंथ प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील. सदर ग्रंथप्रदर्शनात ज्या लेखकांनी स्वतः पुस्तक प्रकाशित केले आहे, त्यांना त्यांची पुस्तके विक्रीला ठेवण्यासाठी *महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिकरोड* एक दालन उपलब्ध करून देणार आहे. याबाबत अधिक माहिती साठी शाखा अध्यक्ष श्री. उन्मेष गायधनी ( ०२५३- २४६३५९३ ) अथवा प्रमुख कार्यवाह श्री. शिवाजी म्हस्के ( ७५८८०९७८७४ ) यांच्याशी संपर्क साधावा, ही विनंती.
