
नांदगाव ( प्रतिनिधी) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव यांच्या प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने रक्तगट तपासणी (Blood Group Checking) ही विस्तार उपक्रम (Extension Activity) यशस्वीपणे राबविण्यात आली.या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. यू. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. एम. बी. आटोळे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. पी. एन. जाधव, प्रा. ए. एम. लव्हाटे व प्रा. पी. एस. कडलग तसेच प्रयोगशाला सहाय्यक सागर वडकते, शंकर थोरात, सुर्यवंशी यांनी सक्रिय सहकार्य केले.या रक्तगट तपासणी उपक्रमात द्वितीय वर्ष बी.एस्सी. प्राणीशास्त्र विभागाचे विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. उपक्रमादरम्यान ग्रामस्थांचा रक्तगट तपासण्यात आला व त्यांना त्यांच्या रक्तगटाची माहिती देण्यात आली. यासोबतच रक्तदानाचे महत्त्व, आरोग्यविषयक जागरूकता आणि आपत्कालीन परिस्थितीत रक्तगटाची उपयुक्तता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.सामाजिक आरोग्यजागृतीच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरला असून विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव व सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यास त्याचा मोठा हातभार लागला.
