
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१४९ वा दिवस
तुम्ही जगातल्या थोर पुरुषांची चरित्रे वाचली तर ते स्थितप्रज्ञ होते असे तुमच्या ध्यानी येईल. कोणत्याही गोष्टीमुळे त्यांच्या मनाचा तोल ढळत नसे. म्हणून जो संतापी असतो त्याच्या हातून फारसी कार्य घडत नाही. ज्याचा पारा कधी चढत नाही त्याच्या हातून मोठी कामे घडतात. संताप, विद्वेष वा अन्य विकारांच्या आहारी जाणाऱ्यांच्या हातून काम तर होत नाहीच, उलट तो स्वतःचा विनाश करून घेतो. शांत, क्षमाशील, समतोल वृत्तीची माणसेच फार मोठे कार्य करू शकतात. विकाराची प्रत्येक लहर संयमाने थोपवा. ते तुमच्या हिताचे आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर पौष २३ शके १९४७
★ पौष वद्य /कृष्ण १०
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. १३ जानेवारी २०२६
★ भोगी
★ १८९९ गोविन्द बल्लाळ देवल यांच्या ’संगीत शारदा’ या नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.
★ १९४९ पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्मदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
