
गावदरा वेहेळगाव (प्रतिनिधी) पस्तीस चाळीस वर्षानंतर काहीतरी नवीन पाहायला मिळाले असे पालकांचे बोल ऐकल्यावर शिक्षकांना खूप आनंद झाला याच मागच कारण म्हणजे जिल्हाजि.प.शाळा गावदरा वेहेळगाव येथे भरला आनंद मेळावा परिषद प्राथमिक शाळा गावदरा (वेहेळगाव)ता. नांदगाव येथे लहान चिमुकल्यांनी भरवलेला बाल आनंद मेळावा. गिरणा नदीच्या काठी असलेली ही लहानशी भोई वस्ती सर्व पालक गोरगरीब गावात बिस्कीट, चहा साखर सारखे वस्तू देखील मिळत नाहीत म्हणजे ह्या गावात दुकानच नाही अशा ठिकाणी मुलांनी आनंददायी असा बाल आनंद मेळावा भरवला.यावेळी वस्तीवरील महिलांच्या हस्ते रेबीन कापून मोठ्या उत्सहात मेळावाचे उदघाटन करण्यात आले. मेळाव्यात विद्यार्थांनी गुलाबजाम, इडली चटणी, ओली भेळ, पॉपकॉर्न, शरबत, भाजीपाला, खमंग, कडकपोहे, चिवडा, सुक्की भेळ, पोहे, मुरमुरे लाडू, मसाला पोंगा, कोथिंबीर वडी, पालक व कांदा भजी, सोयाबीन चिल्ली, समोसे, लाडू आणि फिश फ्राय देखील मेळाव्यात विक्रीला आणण्यात आले होते. या आनंद मेळावा मध्ये खरं म्हणजे पालकांचे मोठे योगदान म्हणावे लागेल कारण वस्तीवर काहीही सुविधा नसतांना फक्त मुलांच्या आनंदासाठी एवढी मेहनत घेतली म्हणूच याला आनंद मेळावा म्हटलं जात असेल असा तर्क लोकांनी लावला. या मेळाव्यातून मुलांच्या कला गुणांना वाव मिळाला, मुलांना व्यवसाय व व्यवहार कसा करतात हे कळाले. यात काही गणितीक्रिया करून मुलांनी देवाण घेवाण कशी करायची हे शिकले. यात नफा किव्हा तोटा कसा होतो हेही त्यांना समजले.ह्या मेळाव्यात पालकांनी खरेदी साठी मोठी गर्दी केली होती विशेष करून महिलांचा मोठा सहभाग यात दिसून आला. गावातील तरुण मित्र मंडळ यांनी मुलांचे कौतुक केले व सर्व खाद्यपदार्थ यांचा स्वाद घेतला काही महिलांनी तर घरच्यांना पार्सल ही नेले. ह्या मेळाव्यात आर्थिक व्यवहाराचा विचार केला असता कमीत कमी दोन ते अडीच हजार रुपयांची उलाढाल ह्या मेळाव्यात झाली असावी असा अंदाज शिक्षकांनी लावला. मेळावा संपल्यानंतर मुलांनी कमवलेली मेहनतीची कमाई ते आनंदाने सर्वाना दाखवत होते त्यावरून खरा आनंद मेळावा भरला याची जाणीव नक्कीच झाली. हा उपक्रम पाहून गावातील ग्रामस्थांनी खूप आनंद व्यक्त केला. आपल्या शाळेची प्रगती व नवनवीन उपक्रम यामुळे गावदरा शाळा राज्यात ओळखली जाऊ लागली असे समाधान व्यक्त केले व हे उपक्रम राबवणारे श्री महेश थोरे सर व विलास सोनवणे सर यांचे भरभरून कौतुक केले. मुलांना शिक्षणाबरोबर व्यावहारिक ज्ञान ही देणे महत्वाचे आहे असे श्री विलास सोनवणे यांनी बोलून दाखवले व आलेल्या सर्व ग्रामस्थांचे श्री महेश थोरे सरांनी आभार मानले.
