
जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या रोडू अण्णा गोविंदराव पाटील वरिष्ठ महाविद्यालय जळगाव निं स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ साहेब आणि स्वामी विवेकानंद या दोन दिग्गजांची जयंती साजरी करण्यात आली
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव मा.महेंद्र रोडू अण्णा पाटील हे होते. या समवेत संस्थेच्या अध्यक्षा कासुताई रोडू अण्णा पाटील,समन्वयक निंबाजी शिंदे, प्राचार्य श्री.सद्दाम अली अन्सारी पर्यवेक्षक व्ही. डी काळे सर, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमावेळी विद्यार्थींनीच्या हस्ते स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ‘.यावेळी प्रा. सुदय बोरसे,प्रा. शारिक सर,एन.एस.एस.प्रमुख निसार सर, वानखेडे सर ,आर के काका उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश ठोके यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.प्रशांत देवरे यांनी केले .आणि कार्यक्रमांचे आभार प्रा.अमोल अहिरे यांनी केले
