


रोहिले ( प्रतिनिधी ) श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित माध्यमिक विद्यालय रोहिले बुद्रुक तालुका नांदगाव. नाशिक. येथे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न. माध्यमिक विद्यालय रोहिले बुद्रुक येथे स्नेहसंमेलन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापिका सौ जाधव मॅडम यांची निवड करण्यात आली. प्रमुख अतिथी रोहिले बुद्रुक ग्रा.प. सरपंच सौ. ठकुबाई पवार तसेच उपसरपंच सौ सुनंदाबाई बागुल यांची उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे शिवानंद सूर्यवंशी सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद रोहिले बुद्रुक. पत्रकार मुक्ताराम बागुल, संजय जोंधवाल,, ताराचंद गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, जनार्दन गायके, संदीप थोरात, आदिनाथ गायके, रवींद्र बागुल, अंतरकर सर, भारतीताई बागुल, बागुल ताई, इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन, दीप प्रज्वलन करण्यात आले.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बाबासाहेब सोनवणे सर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात गणरायांच्या गीताने करण्यात आली. वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध कला गुणांचे दर्शन
