
जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक डी. जे. देवरे होते. समवेत प्रमुख पाहुणे म्हणून सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, पर्यवेक्षक व्ही. डी काळे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी होते. प्रतिमेचे पूजन केले. प्रास्ताविक डी. के .जगताप यांनी केले, सूत्रसंचालन नरेंद्र अहिरे यांनी केले, तर आभार ए. एम. साळुंके यांनी मानलेत.

