
सोलापूर (प्रतिनिधी ) – 17 जानेवारी रोजी साहित्य सेवा सेवा संघ (सोलापूर साहित्यिक मंच)च्या वतीने, कवी शैलेश उकरंडे लिखित “महाराष्ट्राच्या पाऊलखुणा” या काव्य संग्रहाचे प्रकाशन जेष्ठ पत्रकार श्री पद्माकर कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेत पार पडले, यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मसाप पुणे शाखा सोलापूरचे अध्यक्ष श्रुती श्री वडगबाळकर मॅडम होते, तर प्रमुख वक्ते म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. श्री शिवाजीराव शिंदे यांनी मार्गदर्शन केले. या पुस्तकांची प्रस्तावना कवी लेखक दत्तात्रय इंगळे यांनी व साहित्यिक सौ. वदंना कुलकर्णी यांनी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री नरेंद्र गुंडेली यांनी केली. आभार प्रदर्शन कवी शैलेश उकरंडे यांनी केले.

साहित्य सेवा संघ (सोलापूर साहित्यिक मंच) यांनी हे तिसरे पुस्तक प्रकाशन केले आहे.
पुस्तक प्रकाशन कार्यक्रमा नंतर लगेचच मान्यवर कवीचे कवी संमेलन पार पडले, कवी संमेलनाच्या अध्यक्षपद कादंबरीकार श्री दस्तगीर जमादार सर यांनी भूषवले तर कवी संमेलनाचे सूत्रसंचालन दत्तात्रय इंगळे यांनी केले या कार्यक्रमात, श्री मधुकर हुजरे, धाराशिव, श्री अशोक मोहिते, बार्शी, महेश रायखेलकर, सुरेश निकंबे सर, कु. छाया उंब्रजकर , सौ.अनुराधा विभुते ताई,श्री जावेद शेख,
मयुरेश कुलकर्णी,
श्री मुक्तेश्वर मूळे, सौ.वनिता घोडके, सौ.राजश्री जाधव,श्री दत्तात्रय इंगळे, श्री नरेंद्र गुंडेली,
श्री शैलेश उकरंडे सर,
श्री जमालोद्दीन शेख सर,श्री प्रकाश महामुनी सर, बार्शी
श्री विठ्ठल टाक सर,
सौ शुभदा पोतदार ताई,
ऍड.सौ.सुनीता शटगार ताई,
श्री बालाजी गोप,
सौ.शैलजा देवधर ताई, रवींद्र ठोकळे,
श्री चंद्रप्रकाश यनगुंडी,
श्रीमती रेणुका सुतार ताई,
सौ. मंगला बोराडे ताई, विजय कुमार सोनवणे, सह पंचेचाळीस कवीनी आपल्या बहारदार कविता सादर केल्या.

हा कर्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री दत्तात्रय इंगळे, प्रा. नरेंद्र गुंडेली, जावेद शेख, मयुरेश कुलकर्णी, जमलोद्दीन शेख, सुरेश निकंबे यांनी परिश्रम घेतले.
