
दिंडोरी ( प्रतिनिधी) :-रयत शिक्षण संस्थेच्या मा.श्री शरदरावजी पवार माध्य.विद्यालय निगडोळ ता.दिंडोरी जि.नाशिक या विद्यालयास दिंडोरी लोकसभेचे खासदार मा.भास्कररावजी भगरे साहेब यांनी त्यांच्या खासदार निधीतून गुरुवार दि.१जानेवारी २०२६ रोजी डिजिटल पोडियम उपलब्ध करून दिले.विद्यालयाच्या विविध शैक्षणिक कार्यक्रमाप्रसंगी पोडियमची नितांत गरज होती.चिंचखेड पिंपळगाव या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी निघडोळ विद्यालयाला डिजिटल पोडियमची सस्नेह भेट दिली.
खासदार भास्करजी भगरे साहेब यांच्या हस्ते विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन मा.श्री बबनरावजी मालसाने,विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री देवदत्त बोरसे व स्कूल कमिटीचे सदस्य मा.श्री.शरदभाऊ मालसाने,संजय मालसाने,रमेश आप्पा मालसाने यांनी पोडियमची सस्नेह भेट स्विकारली.याप्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री.एन.जे.कापडणीस व शिक्षकेतर कर्मचारी श्री.टी.व्ही.भामरे उपस्थित होते.भविष्यातही विद्यालयासाठी शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मा.श्री.भास्कररावजी भगरे साहेब यांनी दिले.
