
सिन्नर ( प्रतिनिधी)
मावळत्या वर्षाला निरोप देताना तसेच नववर्षाचे स्वागत करताना तरुण पिढी सेलिब्रेशनच्या नावाखाली मद्याची पार्टी करतात व अनुभव घेताना व्यसनाच्या आहारी जातात.व्यसनामुळे अनेकांचे जीवन बरबाद होते याची दखल घेऊन तरुणांनी दारू न पिता, दूध पिणे हितकारक आहे,त्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गेल्या 30 वर्षांपासून” द, दारूचा नव्हे तर दुधाचा !” हा उपक्रम सुरू केला. सिन्नर अंनिसच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरिकांना या उपक्रमांतर्गत दूधाचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून तसेच शहिद नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.अंनिसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी व्यसनाचे दुष्परिणाम यावर प्रबोधन करून तरुणांनी दारू पिण्याऐवजी दूध पिण्याचा सल्ला दिला.दुधामुळे शरीर धष्टपुष्ट व बलवान होते तर दारू पिण्यामुळे तरुण पिढी बरबाद होताना दिसते.त्यांना अनेक आजाराचा सामना करावा लागतो,

त्यासाठी दूध पिण्याचा संदेश अंनिस तर्फे या उपक्रमातून देण्यात आला.यावेळी सिन्नर तालुका अध्यक्ष हरिभाऊ तांबे ,कार्याध्यक्ष सुकदेव वाघ, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.श्यामसुंदर झळके, वृक्षमित्र विष्णू वाघ,प्रभाकर चतुर, महामित्र दत्ता वायचळे, डॉ.रावसाहेब जाधव,संजय नवसे,श्रावण वाघ,रामदास छल्लारे, आनंदा कांदळकर,अशोक कासार,शिवाजी बर्गे,दत्तात्रय शिरतार, नरेंद्र कपूर,रमेश भाटजिरे आदी उपस्थित होते.
