
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१३७ वा दिवस
मन जाणिवेच्या पलीकडे जाऊ शकते, आपले मन जणू एखाद्या तलावासारखे आहे, आणि आपण करीत असलेला प्रत्येक विचार म्हणजे जणू त्या तलावात उठणारा एकेक तरंग, एकेक लाट आहे. ज्याप्रमाणे तलावात तरंग किंवा लाटा उसळतात, कोसळतात आणि विरून नाहीशा होतात, त्याचप्रमाणे चित्तातही विचारांचे तरंग वा लाटा सतत उठत असतात आणि मग विरून जात असतात; पण त्या अजीबातच नाहीशा होत नसतात. चित्तात उठणारे ते तरंग वा त्या लाटा क्रमशः अधिकाधिक सूक्ष्म होत जातात, परंतु सूक्ष्मस्वरूपात विद्यमानच राहतात, आणि प्रयोजन पडताच केव्हाही फिरून उदित होण्यास तत्पर असतात.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर पौष १२ शके १९४७
★ पौष शुध्द /शुक्ल १३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. १ जानेवारी २०२६
★ १८८६ रामकृष्ण परमहंस यांचा ‘कल्पतरु दिन’
★ ख्रिस्ताब्द सन २०२६ ख्रिस्ती नववर्षारंभ
★ १६६२ पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचा जन्मदिन.
★ १८४८ महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.
★ १८६२ इंडियन पिनल कोड (भारतीय दंड संहिता) अस्तित्वात आली.
★ १९४३ जगप्रसिध्द शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, थोर मानवतावादी विचारवंत रघुनाथ अनंत माशेलकर यांचा जन्मदिन
★ ख्रिस्ती नववर्षाच्या आपणा सर्वांना मंगलमय, आरोग्यमय व उत्साहवर्धक हार्दिक शुभेच्छा.
