
मनमाड ( प्रतिनिधी )मराठा विद्या प्रसारक समाजाचे आदर्श इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात अनेक अनेक विद्यार्थ्यांनी संघ -समुह बनवून
मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाघाटन अध्यक्ष श्री. दामुअण्णा पाटील व उपाध्यक्ष श्री.बाळासाहेब साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. नरेंद्र कांबळे, श्री.अशोक व्यवहारे ,कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मनमाड . प्राचार्य डॉ. डि.डि. गव्हाने,अभिनव बालविकास शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर.एस. वाघ इ. मान्यवर उपस्थित होते निसर्गरम्य वातावरणात या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल,मांडणी केली होती.

केवळ मांडणी न करता आपल्या स्टँलवरील पदार्थ कशा पद्धतीने विक्री करावी व ग्राहकाला आपला माल कसे पटवून आकर्षक करावे, कुठलाही व्यवसाय हा लहान मोठा नसतो अशा प्रकारे छोटे छोटे व्यवहारज्ञान विद्यार्थ्यांना या आनंद मेळावा मधुन समजले. व पुढील उपक्रम काय असेल याची उत्सुकता विदयार्थ्यांना लागली. म.वि.प्र नांदगाव संचालक श्री.अमितभाऊ बोरसे- पाटील यांनी उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. शाळेच्या प्राचार्या.आहेर एस.आर. मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे नियोजन शालेय सांस्कृतिक प्रमुख श्रीमती. ऐ.के. बोंधडे यांनी केले. सुञसंचालन श्रीमती एस.व्हि.शिंदे तर आभार श्रीमती.ऐ.मोरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी शालेय शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
