
सिन्नर ( प्रतिनिधी): प्राथमिक शाळा निमगाव, सिन्नर येथे पार पडलेल्या केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत जिल्हा परिषद मॉडेल स्कूल, बारागाव पिंप्री (ता. सिन्नर) या शाळेने घवघवीत यश संपादन करत केंद्रस्तरीय लहान गटाचा अध्यक्ष चषक पटकावला. विविध शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सर्वाधिक पारितोषिके मिळवत शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेचा प्रत्यय दिला.
या यशासाठी मार्गदर्शन करणारे शिक्षक संगीता मुंढे, संगीता राजभोज ,राजेंद्र पाटील , मनीषा उगले,गोरक्ष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ही कामगिरी साध्य केली.
स्पेलिंग बी स्पर्धेत समर्थ सुदर्शन उगले (इयत्ता पहिली)विराज जाधव (उत्तेजनार्थ), श्रेया संजय उगले (इयत्ता दुसरी) आणि प्रत्युष प्रकाश नारद (इयत्ता चौथी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर आराध्या दिनेश उगले (इयत्ता तिसरी) हिने तृतीय क्रमांक मिळवला. मॅथ बी स्पर्धेत कु. समृद्धी किशोर उगले (इयत्ता चौथी) हिने द्वितीय क्रमांक मिळवला. वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत शर्विल दीपक पानसरे (इयत्ता तिसरी) याने प्रथम क्रमांक पटकावला. चित्रकला स्पर्धेत आराध्या निलेश कापसे (इयत्ता चौथी) हिने द्वितीय क्रमांक मिळवला. वैयक्तिक नृत्य स्पर्धेत तन्वी विजय कटके (इयत्ता तिसरी) हिने द्वितीय क्रमांक पटकावला. समूह नृत्य स्पर्धेत शालेय संघाने प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या यशात भर घातली.

या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी राजेश डामसे, विस्ताराधिकारी कैलास सांगळे, केंद्रप्रमुख इरफान पटेल, मुख्याध्यापक नवनाथ हांडगे, सरपंच संध्या कटके, उपसरपंच योगेश गोराडे, शाळा समिती अध्यक्ष सागर उगले, उपाध्यक्ष संदीप जाधव व सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची पुढील बीट स्तरासाठी निवड झाली आहे.
