
..
नाशिक रोड (प्रतिनिधी ) दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट,नाशिक संस्थेचे स्वर्गीय अध्यक्ष प्र.पु.तथा बाबासाहेब वैशंपायन यांच्या जयंती निमित्त आज मंगळवार दि.३०/१२/२०२५ रोजी जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट,नाशिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाशजी वैशंपायन यांच्या शुभहस्ते हनुमान प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन फटाक्यांच्या आतिषबाजीने व आकाशात फुगे सोडून ९ वी जिल्हास्तरीय निमंत्रित १७ वर्षाखालील वयोगट मुले/मुली अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांनी यावेळी मनोगतातून राष्ट्रीय व प्रादेशिक खेळांना प्राधान्य द्यावे.आणि प्रत्येकाने खिलाडूवृत्तीने खेळावे,खेळ हा अभ्यासाइतकाच महत्त्वाचा घटक आहे म्हणून प्रत्येकाने मैदानी खेळाबरोबरच इतरही खेळांनाही महत्त्व द्यावे.तसेच खूप छान खेळा,बक्षिसे मिळवा असे खेळाडूंना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.व खेळाडूंना शुभेच्छा देत उद्घाटन झाले असे जाहीर केले.सरस्वती विद्यालय एम.जी.रोडचे चेअरमन रवींद्र कदम यांनी उपस्थित सर्वाचे स्वागत करुन प्रास्ताविकातून स्व.बाबासाहेब वैशंपायन हे ऋषीतुल्य व्यक्ती आज जरी आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य आपल्याला नेहमी प्रेरणादायी ठरते.तसेच शारीरिक मानसिक प्रगती होण्यासाठी मैदानी खेळ खेळले पाहिजे,असे प्रतिपादन केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय संस्थेचे स्विकृत सदस्य भास्कर कवीश्वर यांनी केले.प्रमुख पाहुणे प्रकाशजी वैशंपायन यांचा सत्कार संस्थेचे सेक्रेटरी हेमंत बरकले यांनी केले.तसेच उपस्थित पदाधिकारी यांचे बुके,शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.

याप्रसंगी कु.सुषमा चौधरी व कु.तेजल सहारे या राष्ट्रीय खेळाडूच्या नेतृत्वाखाली क्रीडा ज्योतीचे आगमन मैदानावर करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली.तसेच खो-खो खेळाडू कु.मोनिका तलवारे या विद्यार्थिंनींनी उपस्थित सर्व खेळाडूंना शपथ दिली.त्याबरोबरच कु.सुषमा चौधरी,कु.कौशल्या कहांडोळे,कु.ताई पवार,कु.गौरव बेंडकोळी या विद्यार्थी-विद्यार्थिंनींनीची जबलपूर (मध्यप्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत निवड झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आले.तसेच सामन्यासाठी उपस्थित असणारे पंच यांचेही गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आले.आभारप्रदर्शन संस्थेचे सेक्रेटरी हेमंत बरकले यांनी तर सुत्रसंचालन अनिल सानप यांनी केले.स्पर्धा यशस्वीतेसाठी संस्था व सर्व शालेय पदाधिकारी,सर्व समितीचे प्रमुख,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन,उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी,सेक्रेटरी हेमंत बरकले,असि.सेक्रेटरी सरला तायडे,श्री डी.डी.बिटको बॉईज हायस्कूलचे चेअरमन रोहित वैशंपायन,सरस्वती विद्यालय एम.जी.रोडचे चेअरमन रवींद्र कदम,कामटवाडेच्या चेअरपर्सन अंजली प्रधान,गव्हर्निग कौन्सिल सदस्य दिनेश जाधव,अमृता कवीश्वर,अनिल ठाकरे,कैलास बागुल,भारती चंद्रात्रे,स्विकृत सदस्य भास्कर कवीश्वर,दिलिप निकम,संस्था अधिक्षक साहेबराव जाधव,जॉईट सेक्रेटरी विलास देवरे,शितल लिंडायत,संगिता चव्हाण,शाळेच्या अधिक्षिका वासंती पेठे,मीना वाळूंजे,शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे,सुनिता बाजपेयी,उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी,मिलिंद कोठावदे, पर्यवेक्षिका सुषमा गवारे,अनिल ठाकरे,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व जिल्हातून आणि विविध शाळेतून आलेले विद्यार्थी,शिक्षक तथा पंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
