
लासलगाव ( प्रतिनिधी) : येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा चांगल्या प्रकारे व्यक्तिमत्त्व विकास होतो असे प्रतिपादन नू.वि.प्र. संस्थेचे अध्यक्ष ॲड.आंबादास आवारे यांनी केले. लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रीक्षेत्र संतवण, खेडलेझुंगे येथे संपन्न झालेल्या विशेष हिवाळी शिबिराच्या समारोप प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते, कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाला समारोपकर्त्या म्हणून अमृताताई पवार उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून ऑलम्पिक धावपटू संजीवनीताई जाधव उपस्थित होत्या.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड.आंबादास आवारे, योगीराज तुकाराम बाबा संस्थानचे ह.भ.प. केशव महाराज जाधव, लासलगाव पोलीस स्टेशनचे स.पो.नि. भास्करराव शिंदे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, प.पू. तुकाराम बाबा माध्यमिक व उच्च माध्य. विद्यालयाचे प्राचार्य लहानु ठाकरे, विजय सदाफळ, खेडलेझुंगे चे उपसरपंच विश्वनाथ घोटेकर, आनंदराव घोटेकर, तंटामुक्ती उपाध्यक्ष अशोक घोटेकर, पर्यवेक्षक उज्वल शेलार, किशोर गोसावी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी अमृताताई पवार, संजीवनीताई जाधव, लासलगाव पोलीस स्टेशनचे स.पो.नि. भास्करराव शिंदे आणि प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. तर गावाच्या वतीने ह.भ.प. केशव महाराज जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. स्वयंसेवकांचे प्रतिनिधी म्हणून शुभम आवारे व प्रियंका रासकर यांनी मनोगत व्यक्त केले. रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे यांनी प्रास्ताविकातून शिबिर कालावधीत विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कामाचा अहवाल सादर केला. उत्कृष्ट स्वयंसेवक आणि उत्कृष्ट ग्रुप ला मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शिबिरात मोफत आरोग्य तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी श्रीक्षेत्र संतवन परिसर, ग्राम स्वच्छता, गावातील स्मशानभूमी, अंगणवाडी परिसर, गावातील रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, प्राथमिक शाळा परिसर, मंदिर परिसर, सार्वजनिक सभागृह परिसर, बाजारपेठ आदी ठिकाणी स्वच्छता केली. याप्रसंगी स्वयंसेवकांना दररोज योगा व लेझीम चे धडे देण्यात आले. तसेच शंखनाद कार्यशाळा, पेपर मॉडेल, जंगली मॉडेल, मॉडेल रिले, पथनाट्यातून जनजागृती, गावातील कुटुंब सर्वेक्षण इत्यादी उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा.सुनिल गायकर यांनी केले, तर आभार प्रा.देवेन्द्र भांडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी स्वयंसेवक विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता रा.से.यो. गीताने झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर व प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.संजय शिंदे, प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेन्द्र भांडे, प्रा.निकिता चव्हाण, प्रा.श्रेया जगताप, प्रा.राधा खांडगौरे, प्रा.कावेरी गुंड यांच्यासह प्राध्यापक व स्वयंसेवक विद्यार्थी वर्गाने परीश्रम घेतले.
