
आपणास कळविण्यात येते की, नाशिक जिल्हा खो-खो संघटनेच्या मान्यतेने व दि न्यू एज्युकेशन इन्स्टिटयूटच्या अमृतपूर्ती महोत्सावाचा वर्षानिमित्त सुरु झालेली ९ वी जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा संपन्न होत आहे.खो-खो या खेळाची विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी,खेळांडूनां प्रोत्साहन मिळावे या उद्देशांने मंगळवार,दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी भव्य जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी स्पर्धेसाठी आपल्या शाळेच्या खो-खो संघाची प्रवेशिका पाठवावी.ही विनंती.
स्पर्धेचे नियम :-
१) स्पर्धा ही जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या नियमानुसार १७ वर्षे मुले/मुली शालेय संघासाठी आहे.
२) स्पर्धा बाद पध्दतीने होतील. ३) स्पर्धेचा वयोगट १७ वर्षे मुले/मुली.
४) जन्मतारीख – स्पर्धेतील खेळाडू १ जानेवारी २००९ नंतर जन्मलेला असावा.
५) पारितोषिक १७ वर्षाखालील मुले/मुली –
१) प्रथम रु.५,०००/- रोख,
२) व्दितीय रु.३,०००/- रोख.
३) तृतीय रु.२,०००/- रोख.
४) अष्टपैलू खेळाडू रु.५००/- रोख.
५) उत्कृष्ट आक्रमक रु.५००/- रोख.
६) उत्कृष्ट संरक्षण रु.५००/- रोख.
७) प्रत्येक संघास खेळाडूचे प्रवेश अर्ज व पात्रता अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
८) स्पर्धा कालावधी मंगळवार दिनांक ३०/१२/२०२५ सकाळी ८:०० वा.
९) स्पर्धेचे स्थळ:- सदर स्पर्धेचे उद्घाटन व समारोप श्री डी.डी.बाईज हायस्कूल,व ज्यूनिअर कॉलेज,सी.बी.एस.जवळ नाशिक.प्रांगण येथे होईल.
९) स्पर्धेबाबत अधिक माहितीः १)श्री भास्कर कविश्वर ९८९०३१२९५७ २)श्री दिनेश जाधव ९८२२७७७२४३
३)श्री राजेंद्र सोमवंशी ९८२३०१७९७७ ४)श्री अनिल ठाकरे ९८६००२८२३३
१०) खेळाडूनी मौल्यवान वस्तु बरोबर आणू नये हरविल्यास स्वतःजवाबदार राहातील.
११) शनिवार दिनांक २७/१२/२०२५ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत आपला प्रवेश अर्ज संस्था कार्यालयात सादर करावा.सर्व खेळाडूंसाठी दुपारी १:०० ते २:०० दरम्यान अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
