
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१३२ वा दिवस
आपल्या वाट्याला दररोज येणाऱ्या दुःखांपासून आपणास मुक्ती हवी असते, ही मुक्ती मिळवण्यासाठी म्हणजे भौतिक आध्यात्मिक मुक्ती मिळविण्यासाठी आपण धडपडत असतो. या जगाचे चक्र याच भावनेभोवती घुमत असते, उद्देश एकच असला तरी तिथपर्यंत पोहोचण्याची मार्ग मात्र वेगवेगळे आहेत. हे मार्ग आपल्या स्वभावानुसार नक्की केले जातात मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला या विश्वाच्या सीमांच्या पलीकडे जायला हवे, इंद्रियांच्या माध्यमातून आपण ज्या ठिकाणी कोणताही अनुभव घेऊ शकतो किंवा ज्या ठिकाणी आपली कल्पना शक्ती काम करते अशा कोणत्याही ठिकाणी आपल्याला मुक्ती मिळू शकत नाही.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर पौष ७ शके १९४७
★ पौष शुध्द /शुक्ल ७
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. २७ डिसेंबर २०२५
★ १६६६ शाखेचे दहावे धर्मगुरू गुरु गोविंद सिंग यांची जयंती.
★ १७९७ उर्दू भाषेतील शायरीचे बादशाह मिर्झा गालिब यांचा जन्मदिन.
★ १९११ च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात “जण गण मन” हे रवींद्रनाथ टागोर रचित गीत पहिल्यांदा गाण्यात आले.
★ १८९८ स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्मदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
