
लासलगाव : दि.२६ डिसेंबर, येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या श्रीक्षेत्र संतवन, खेडलेझुंगे येथे संपन्न होत असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय निवासी विशेष संस्कार शिबिरात आरोग्य तपासणी शिबिर व हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभाग दरवर्षी आरोग्य तपासणी व हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करत असते. लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने सर्व स्वयंसेवक विद्यार्थी व गावातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

डॉ.श्रीकांत आवारे यांनी आरोग्य शिबिराचे उद्घाटन केले तर लासलगाव डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.स्वप्नील जैन हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांच्यासमवेत डॉ.संगीता सुरसे, डॉ.युवराज पाटील, डॉ.ऋता धनगाव, डॉ.अविनाश पाटील, डॉ.वैशाली पवार, डॉ.नितीन न्याहारकर, डॉ.ईश्वर वाकचौरे, डॉ. सागर घनगाव, डॉ. अर्चना लोहाडे इत्यादी उपस्थित होते. डॉ.श्रीकांत आवारे यांनी उद्घाटनपर मनोगतात स्वयंसेवकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. तसेच डॉ.संगीता सुरसे, डॉ.अविनाश पाटील, डॉ.ईश्वर वाकचौरे, डॉ.वैशाली पवार यांनी देखील स्वयंसेवकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय समारोप डॉ.स्वप्नील जैन यांनी केला.

तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, देवगाव आणि खेडलेझूंगे यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिरातील सर्व स्वयंसेवकांची मोफत हिमोग्लोबिन (HB) तपासणी करण्यात आली. खेडलेझूंगे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शिंदे त्यांच्या समवेत आरोग्य सेवक डॉ.चंद्रकांत यादव, डॉ.शोभा कुंभार्डे इत्यादी स्टाफ उपस्थित होते. या शिबिरातील सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांच्या HB, RBC, Platlet, WBC, BP इत्यादी तपासण्या करण्यात आल्या.
या आरोग्य तपासणी व हिमोग्लोबिन तपासणी शिबिरासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा.गोविंदरावजी होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे डॉ.संजय शिंदे, प्रा.सुनिल गायकर प्रा.देवेंद्र भांडे आणि रा.से.यो. स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
